शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतविश्वाचा स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
3
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
4
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
5
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
6
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
7
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
8
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
9
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
10
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
11
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
12
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
13
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
14
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
15
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
16
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
17
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
18
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
19
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
20
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचे दर घसरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST

तुरीचे दर घसरले बुलडाणा : बाजारात तुरीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेने तुरीची साठवणूक करणारे शेतकरी अडचणीत ...

तुरीचे दर घसरले

बुलडाणा : बाजारात तुरीच्या दरात घट झाली आहे. त्यामुळे भाववाढीच्या अपेक्षेने तुरीची साठवणूक करणारे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. तूर विकण्यासाठी आता शेतक-यांना भाववाढीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

---

कच-याची कोंडी सुटेना

मोताळा : बसस्थानकासमोर गत काही महिन्यांपासून कच-याचे साम्राज्य आहे. कच-याची समस्या निकाली काढण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. कोरोनाकाळात स्वच्छता ठेवण्याची मागणी शे. बिलाल यांनी नगरपंचायतीकडे केली आहे.

-----

स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू

बुलडाणा : स्मार्ट कार्डसाठी डिसेंबर २०२० ते जानेवारी २०२१ दरम्यान नोंदणी करणा-या ज्येष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाकडून स्मार्ट कार्ड वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ज्येष्ठ नागरिकांनी संबंधित बसस्थानकावरून स्मार्ट कार्ड कार्यालयीन वेळेत नेण्याचे आवाहन केले आहे.

----

कोरोना लसीकरणाचा वेग वाढवा!

बुलडाणा : जिल्ह्यात कोरोना विषाणू संक्रमणाच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे कोरोनाचा उद्रेक असलेल्या शहरांमध्ये लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी विनोद सोनोने यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

--------

अवकाळी पावसामुळे आंब्याचा फुलोर झळला

मोताळा : तालुक्यात गत आठवड्यात आलेल्या अवकाळी पावसामुळे माकोडी शिवारातील सुगदेव चिमकर या शेतक-याच्या शेतातील आंब्याचा फुलोर झळला. त्यामुळे शेतक-याचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले.

---

थकीत वसुलीसाठी पालिकांची धडक मोहीम

बुलडाणा : थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जिल्ह्यातील पालिकांनी कंबर कसली आहे. मार्चअखेरीस सुटीच्या दिवशीही जिल्ह्यातील नगरपालिका आणि पंचायतींमध्ये करवसुली केली जाणार आहे.

--------

पीक नुकसानीचे पंचनामे करा

बुलडाणा : अवकाळी पावसाने झालेल्या पीक नुकसानीची तत्काळ पाहणी करून पंचनामे करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. माळविहीर, सुंदरखेड परिसरांतील पीक नुकसानीची पाहणीही संघटनेच्या वतीने करण्यात आली.

-----------

होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती

बुलडाणा : निसर्ग बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने होळीसाठी नैसर्गिक रंगांची निर्मिती करण्यात आली. नैसर्गिक कंद आणि झाडांच्या फुलांचा वापर रंगनिर्मितीसाठी करण्यात आला आहे.

------

लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन

बुलडाणा : कोरोना संचारबंदीकाळात कोविड आपत्ती व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन करणा-यांविरोधात जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई केली जात आहे. शनिवारी सायंकाळी तीन व्यावसायिकांना दुकाने उघडी ठेवल्याबाबत दंड ठोठावला.

----------

चिंचखेडनाथ येथे पाणीटंचाई

बुलडाणा : मोताळा तालुक्यातील चिंचखेडनाथसोबतच जिल्ह्यातील चार गावांमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे चिंचखेडनाथ येथे टँकरने पाणीपुरवठा करण्यास प्रशासनाने मान्यता दिली आहे.

---------------

विनामास्क फिरणा-यांवर कारवाई

मोताळा : कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता उद्रेक लक्षात घेता, विनामास्क फिरणा-या नागरिकांवर नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी कोरोना आपत्ती व्यवस्थापन नियमांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाकडून केले जात आहे.