शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

विजेचा धोका कायमच

By admin | Updated: June 19, 2015 02:35 IST

पहिल्याच पावसात बुलडाणा जिल्ह्यातील तिघांचा बळी ; चार वर्षांमध्ये ३४ जीव गमावले.

खामगाव : यावर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून तिघांचा अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला, तर मंगळवारी पाच माकडे दगावली. बुलडाणा जिल्ह्यात विजेचा वाढता धोका कायम असून, मागील चार वर्षांत तालुक्यात ३४ जणांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मान्सूनपूर्व पावसाचे जिल्ह्यात ७ जून रोजी आगमन झाले. गेल्या आठवडाभरात पाऊस बर्‍यापैकी स्थिरावला आहे. या आठ दिवसांत वीज कोसळून तिघांचा मृत्यू झाला. त्यामध्ये ७ जून रोजी बुलडाणा तालुक्यातील गुम्मी येथील पूजा गणेश नरोटे, ८ जून रोजी सिंदखेडराजा तालुक्यातील सावरगाव माळ येथील राधेश्याम जाधव, तर १0 जून रोजी जळगाव जामोद तालुक्यातील आसलगाव येथील अनिल मैंद यांचा वीज कोसळून मृत्यू झाला. मंगळवारी संग्रामपूर तालुक्यात झाडावर वीज कोसळल्याने पाच माकडे दगावली, तर शेलोडी येथील दोन म्हशी दगावल्या. हा धोका वाढताच असून, पेरणीच्या कामात व्यस्त असलेल्या शेतकर्‍यांनी विजेपासून धोका पोहोचू नये, याबाबत सुरक्षितता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. *केवळ चार वीजरोधक यंत्रांचा प्रस्ताव वीज कोसळून बळी जाणार्‍यांची संख्या दरवर्षी वाढत आहे . त्या तुलनेत बुलडाण्यात केवळ चार ठिकाणी वीजरोधक यंत्रणा प्रस्तावित आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाने २00९ मध्ये शेतकरीहिताचा निर्णय घेऊन राज्यभरात वीजरोधक टॉवर उभारण्याबाबत आदेश दिले होते. यानुसार प्रत्येक जिल्ह्याला दीड कोटींचा निधी मिळाला. नागपूर, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, यवतमाळ, वाशिम, अकोला तसेच बीड, धुळे, चिपळून, नाशिक जिल्ह्यात ही यंत्रणा टप्याटप्यातून उभारली जात आहे; मात्र बुलडाणा जिल्ह्यात अद्यापही याबाबत पुरेसे नियोजन नसल्याची माहिती नैसर्गिक आपत्ती विभागाकडून मिळाली.

वर्ष                जखमी             मृत्यू

२0११-१२          ४६                   ११

२0१२-१३         २२                    0६

२0१३-१४          ५८                   0५

२0१४-१५          ३९                   १२