शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
3
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
4
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
5
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
6
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
7
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
8
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
9
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
10
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
11
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
12
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
13
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
14
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
15
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
16
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
17
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
18
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
19
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
20
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कर्मचा-यांबाबत सकारात्मक - भाऊसाहेब फुंडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:51 IST

शेगाव: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांना शासकीय सेवेत घेण्यासाठी मी सकारात्मक आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.स्थानिक पांडुरंगकृपा कुणबी समाज मंगल कार्यालयात रविवार ३० जुलै रोजी पार पडलेल्या विदर्भातील कर्मचारी मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते ...

ठळक मुद्देविदर्भस्तरीय मेळावा उत्साहात कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचा-यांना कृषिमंत्र्यांचा दिलासा

शेगाव: राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचाºयांना शासकीय सेवेत घेण्यासाठी मी सकारात्मक आहे, असे प्रतिपादन कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी केले.स्थानिक पांडुरंगकृपा कुणबी समाज मंगल कार्यालयात रविवार ३० जुलै रोजी पार पडलेल्या विदर्भातील कर्मचारी मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे कृषिमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. बाजार समिती कर्मचाºयांची फार जुनी असलेली मागणी शासनाने तत्त्वता मान्य करून अभ्यास समिती गठित केली आहे. सदर अभ्यास समितीला २ महिन्याचे आत अहवाल शासनास द्यावयाचा आहे त्याकरिता अभ्यास समितीला अहवाल देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी राज्याचे सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत घेण्यासाठी सदैव सकारात्मक राहणार असल्याचे ना. फुंडकर यांनी यावेळी सांगितले.बाजार समितीच्या कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत घेण्याबाबत हा मेळावा प्रथमत: संत गजानन महाराज यांच्या पावन भूमीत सुरुवात झाली असल्याने कर्मचाºयांच्या मागणीला यश जरूर येईल, असेसुद्धा त्यांनी बोलताना म्हटले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेगाव बाजार समितीचे सचिव तथा बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी विलास पुंडकर यांनी केले. अध्यक्षीय भाषणात राज्याचे कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप डेबरे यांनी उपस्थित कर्मचारी बांधवांच्या शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी सूचना व हरकती जाणून घेतल्या. सदर मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी दिलीप डेबरे, अध्यक्ष म.रा.बा. समिती कर्मचारी संघ पुणे, तर अभ्यास समिती सदस्य, बालाजी भोसीकर, अरविंद जगताप, अंकुशजी झंझाळ, राधेशाम शर्मा, नरेश सुरमवार, पुणे, भंडारा जिल्हा प्रतिनिधी, रविकांत अवथरे, नंदकुमार वरकड, वर्धा, रामकृष्ण पाटील, वाशिम, विजय देशमुख, अमरावती, अमिश निमजे गडचिरोली चंद्रपूर, अशोक झाडे, यवतमाळ, वनिता साबळे, बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी, हरिश तिवारी, गोंदिया, यांची प्रमुख उपस्थिती होती. सदर मेळाव्यास अमरावती, नागपूर विभागातील ११ जिल्ह्यातील १०६ बाजार समितिचे सचिव, कर्मचारी असे एक हजाराच्या वर कर्मचारी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन महेश जेऊरकर बाजार समिती कोरपना, जि. चंद्रपूर यांनी केले तर आष्टी बाजार समितीचे सचिव नंदकुमार वरकड यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेगाव बाजार समितीच्या कर्मचाºयांनी अथक परिश्रम घेतले.दोन महिन्यांत अहवालया अभ्यास समितीला दोन महिन्यांच्या आत अहवाल शासनास द्यावयाचा आहे. त्याकरिता अभ्यास समितीला अहवाल देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी राज्याचे सहकार पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत चर्चा करून राज्यातील बाजार समिती कर्मचाºयांना शासनाच्या सेवेत घेण्यासाठी सदैव सकारात्मक राहणार असल्याचे ना. फुंडकर यांनी यावेळी सांगितले.