शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेच्या घरकुलांना ‘रहिवासी’ सापडेना!

By admin | Updated: April 28, 2017 00:34 IST

१४०० च्या वर घरकुलांसाठीचा २७ कोटी रुपयांचा खर्च पाण्यात!

अनिल गवई - खामगावशहरात शासनाच्या योजनेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये खर्च करुन घरकुलांचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र घरकुलाचा लाभ मिळविण्यासाठी असलेले अतिक्रमण हटविण्याच्या तरतुरीमध्ये अनेकांनी राहते अतिक्रमण न सोडता घरकुलाचा लाभ घेतला नाही. परिणामी या घरकुलांना लाभार्थी मिळाले नाही. ज्यांनी घरकुल नावावर करुन घेतले अशांपैकी अनेकांनी घरकुल भाड्यावर दिले आहेत. त्यामुळे या घरकुलांच्या निर्मितीसाठी शासनाकडून करण्यात आलेला कोट्यवधी रुपयांचा खर्च पाण्यात जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका म्हणून खामगाव नगरपालिकेचा नावलौकीक आहे. दरम्यान, शहरातील नागरिकांना घरकुलाची सुविधा देण्यासाठी खामगाव पालिकेच्यावतीने एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी विकास कार्यक्रम टप्पा-१ अंतर्गत १४३० घरकुलांचे निर्माण करण्यात आले. या घरकुलांची निर्मिती करण्यापूर्वी शहरात विशेष सर्वेक्षण करून योजनेला सन २००७-०८ मध्ये मंजुरी देण्यात आली. त्यानंतर सन २०१० मध्ये सुमारे २७ कोटी रुपयांच्या खर्चांतून घरकुलांची निर्मिती करण्यात आली. मात्र आता रहिवाशी मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.नवीन यादीला गृहनिर्माण प्रतीक्षा !शहरात १४३० घरकुलांची निर्मिती पुर्णत्वास आल्यानंतर या घरकुलाच्या वाटपासाठी लाभार्थ्यांशी पालिकेने संपर्क केला असता, केवळ १६८ लाभार्थ्यांनी लाभार्थी हिस्सा भरून घरकुलांमध्ये राहण्यास अनुकुलता दर्शविली. उर्वरित लाभार्थ्यांनी नकार देत, पालिकेच्या या घरकुल योजनेला धुळकावून लावले. या पार्श्वभूमीवर पालिकेने पुन्हा सर्वेक्षण, जाहीर सभा घेत नवीन लाभार्थ्यांची यादी तयार केली. मात्र, या यादीला अद्यापर्यंत जिल्हा गृहनिर्माण समितीचा हिरवा कंदील मिळालेला नाही.घरकुलांमध्ये अतिक्रमणशहरातील शंकर नगर, शेलोडी रोड, रावणटेकडी परिसरात लाभार्थ्यांनी राहण्यास नकार दिल्यानंतर, शहरातील तसेच ग्रामीण भागातील अनेकांनी या घरकुलांमध्ये अतिक्रमण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, काही ठिकाणी या घरकुलांची तोडफोड करण्यात आल्याचेही दिसून येते.घरकुल नाकारण्याची लेखी कारणेघरकुलाचा लाभ घेण्यास नकार देणाऱ्या लाभार्थ्यांनी पालिकेला, पक्के घर बांधले, स्थानांतरण केले, राहतेघर सोडून जाण्याची इच्छा नाही, या योजनेचा लाभ नको, वैयक्तिक कारणांमुळे अशी पाच कारणे लेखी दिली आहेत. तर ७६६ लाभार्थ्यांनी पालिका प्रशासनाला कोणताही प्रतिसाद दिले नाही.कोट्यवधींचे नुकसान!या घरकुलाच्या निर्मितीसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र, प्रत्यक्षात आतापर्यंत घरकुलांच्या लाभार्थी हिस्यापोटी पालिकेस आतापर्यंत केवळ २५ लक्ष रुपयांची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून लाभार्थी हिस्सा आणि इतर करापोटी कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे.