शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

नियोजन समिती निवडणुकीत भाजप आघाडीला चार जागा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2017 01:23 IST

बुलडाणा : जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ चा निकाल  १0 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला असून, ९ पैकी काँग्रेस आघाडीला पाच तर भाजप आघाडीचा चार जागांवर विजय झाला.

ठळक मुद्देनऊ पैकी काँंग्रेस आघाडीला पाच, भाजप आघाडीला चार जागा नगराध्यक्ष गवळींची नियोजन समितीवर हॅट्ट्रीक 

बुलडाणा : जिल्हा नियोजन समिती निवडणूक २0१७ चा निकाल  १0 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला असून, ९ पैकी काँग्रेस आघाडीला पाच तर भाजप आघाडीचा चार जागांवर विजय झाला. या निवडणुकीची मतमोजणी तीन टेबलवर करण्यात आली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्र. अपर जिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रमोद देशमुख, तहसीलदार सुरेश बगळे, तहसीलदार शैलेश काळे, सहा. पुरवठा अधिकारी राहुल खंडारे, नायब तहसीलदार सुरेश मोरे आदी उपस्थित होते.   या निवडणुकीत नागरिकांचा मागास प्रवर्गातून बाबूराव अवचार पिं.काळे, ता. जळगाव जामोद, राम शंकरराव जाधव साखरखेर्डा ता. सिं.राजा, राजेंद्र सदाशिव पळसकर डोणगाव, ता. मेहकर, मधुकर गोपाळ वडोदे निमगाव, ता. नांदुरा, अनुसूचित जाती प्रवर्ग - रजनी अनिल जवरे नांदुरा, सर्वसाधारण महिला प्रवर्ग - अर्चना संतोष टाले खामगाव, सीमा कैलास डोबे जळगाव जामोद, सर्वसाधारण प्रवर्गातून कासम पिरू गवळी मेहकर, राजेंद्र वसंतराव वाडेकर शिवाजी नगर, मलकापूर यांचा विजय झाला आहे.     ग्रामीण मतदारसंघामध्ये निवडणुकीचा अविरोध निकाल लागला आहे. अनुसूचित जाती महिला प्रवर्गमधून सिंधु पंडितराव खंडारे, दुसरबिड ता. सिं.राजा, शीला घनशिराम शिंपणे मु. टाकरखेड वायाळ, पो डिग्रस बु., ता. दे.राजा, उषा पांडुरंग सावरकर लासुरा, ता. शेगाव, अनुसूचित जाती प्रवर्ग : महेंद्रकुमार श्रावण गवई आव्हा युनूसपूर, ता. मोताळा, सुनंदा हरिदास शिनगारे मिसाळवाडी, ता. चिखली, अनुसूचित जमाती प्रवर्गमधून डॉ. ज्योती शिवशंकर खेडेकर अंत्री खेडेकर, ता. चिखली, नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला) मधून स्वाती राजेंद्र देवचे माटरगाव, ता. शेगाव, मनिषा नितीन पवार हिवरा बु., ता. मेहकर, रेणुका दिलीप वाघ शिवणी, ता. लोणार, जयश्री सुनील शेळके शिवशंकर नगर, सुंदरखेड बुलडाणा, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून सविता गणेश बाहेकर डोंगरखंडाळा, ता. बुलडाणा, कमल जालींदर बुधवत मु. सोयगाव, पो. वरूड, ता. बुलडाणा, पूनम विजय राठोड मु. पिंपरखेड, पो. आडगाव राजा, ता. दे.राजा, सर्वसाधारण प्रवर्गातून मनोज देवानंद कायंदे दे.राजा, प्रमोद रमेश खोंद्रे सोनाळा, ता. संग्रामपूर, रियाजखा इलियासखा पठाण दे.मही, ता. दे.राजा, राजेश श्रीराम मापारी गायखेड ता. लोणार, शरद दत्तात्रय हाडे सवणा, ता. चिखली.  नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला श्रीमती पुष्पा शिवाजी धुड एकता नगर, बुलडाणा, नागरिकांचा मागास प्रवर्गातून अशोक खेडेकर दे.राजा हे अविरोध झाले आहेत.

नगराध्यक्ष गवळींची नियोजन समितीवर हॅट्ट्रीक मेहकर : मेहकर नगर परिषदचे अध्यक्ष कासम गवळी यांनी बुलडाणा जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत सतत तिसर्‍यांदा विजयी होऊन विजयाची हॅट्ट्रीक केली आहे. ८ ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया  पार  पडून १0 ऑगस्ट रोजी बुलडाणा जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात मतमोजणी झाली. या निवडणुकीत काँग्रेस तसेच मित्र पक्षाचे उमेदवार कासम गवळी हे प्रथम  पसंती क्रमांकाची भरघोस मते घेऊन प्रचंड मताधिक्याने विजयी झाले. कासम गवळी हे मागील दहा वर्षापासून जिल्हा नियोजन समितीवर निवडून येत आहेत. यावेळेस तिसरी पंचवार्षिक निवडणूक जिंकून त्यांनी इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे कासम गवळी यांची दोन महिन्यांपूर्वी नगर परिषद महासंघ मुंबईच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कासम गवळी हे विजयी होताच कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करून आनंद साजरा केला. तसेच म.प्र.कॉ.क. सरचिटणीस श्याम उमाळकर, अनंतराव वानखेडे, जयचंद भाटिया, राजेश अंभोरे, ललित इन्नाणी, पंकज हजारी, नीलेश मानवतकर, मुजीब खान, मुजीब कुरेशी, नीलेश सोमण, अलियार खान, तौफिक खान, ओम सौभागे, मनोज जाधव, पिंटू सुर्जन,  राजू रिंढे, तौफिक कुरेशी, हनिफ गवळी, कलिम खान, तसेच असंख्य कार्यकर्त्यानी कासम  गवळी यांचा सत्कार केला.