शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

पितृ पंधरवड्यात शेवगा खातोय भाव, ठोक बाजारात १००, तर घराजवळ १२० रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:37 IST

दमदार पाऊस झाल्याने शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात आवक कमी व मागणी अधिक असल्याने भाजीपाल्याच्या दरात ...

दमदार पाऊस झाल्याने शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बाजारात आवक कमी व मागणी अधिक असल्याने भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे; मात्र या दरवाढीचा फायदा ज्या शेतकऱ्यांजवळ भाजीपाला आहे, अशांनाच होत आहे तर स्थानिक शेतकऱ्यांचा भाजीपाला येण्यास आणखी वेळ लागणार असल्याने भाजीपाल्याच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.

भाजीपाल्याचे भाव (प्रतिकिलो)

भाजीपाला बाजारातील दर घराजवळ

दूधी भोपळा २० ते ३०

गवार ८० ते १००

कारली ५० ते ६०

वांगी ८० ते १००

कांदे २५ ते ३०

पालक ८० ते १००

टमाटे २० ते ३०

बटाटे २० ते ३०

फ्लॉवर ६० ते ८०

सिमला ५० ते ६०

शेवगा १२० १३०

कोथिंबीर १५० ते ६०

मागणी वाढली...

- सध्या पावसाळा सुरू असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा भाजीपाला खराब झाला आहे.

- परिणामी, ठोक बाजारात अपेक्षित भाजीपाला येत नसल्याचे व्यापारी सांगत आहे.

- त्यामुळे जवळपास सर्वच भाजीपाल्यांच्या काही प्रमाणात दरात वाढ नोंदविल्या जात आहे.

व्यापारी काय म्हणतात?

राज्यातील बहुतांश भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. सध्या ग्राहकांकडून मागणी मोठ्या प्रमाणात होत असून, अपेक्षित आवक नाही. परिणामी, दरवाढ होत आहे.

- हरिभाऊ जाधव, व्यापारी.

बाजारात भाजीपाल्याची आवक कमी आहे. आधी पालक ८ ते १० रुपये किलो होता, आता ८० ते १०० रुपये किलोपर्यंत दर पोहोचले आहे. सुरुवातीला टमाटा मातीमोल विकल्या गेले. आता चांगले दर मिळत आहे.

- प्रकाश हेलोडे, व्यापारी

अर्धा-एक किलोसाठी बाजारात कोण जाणार?

शहरातील ठोक भाजीबाजारात कोणतीही गृहिणी अथवा नागरिक खरेदीसाठी जात नाही. घराजवळच भाजीपाला विक्रीसाठी येत असल्याने तेथेच खरेदी केल्या जातो. पावभर भाजीपाल्यासाठी दूर जाणे परवडणारे नाही.

- दीपिका पाटील, गृहिणी

५० रुपयांच्या भाजीपाल्यासाठी ३० रुपयांचे पेट्रोल खर्च करणे परवडणारे नाही. त्यामुळे घराजवळ हातगाडीवर येत असलेल्या भाजीपाल्याची खरेदी करते. तसेच आजूबाजूच्या परिसरात भाजीपाल्याची दुकाने आहेत.

- जयश्री वाघमारे, गृहिणी