शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’च्या धर्तीवर ‘स्मार्ट नगरपालिका’ योजना राबविणार!’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 01:01 IST

‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार येत्या काळामध्ये ‘स्मार्ट नगरपालिका’ योजना राबविणार असून, चिखली शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली.

ठळक मुद्देचिखली न.प. शाळा इमारत, दलित वस्ती योजनेचे भूमिपूजन थाटात

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: केंद्र सरकारने महानगरांना स्मार्ट बनविण्यासाठी अमलात आणलेल्या ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार येत्या काळामध्ये ‘स्मार्ट नगरपालिका’ योजना राबविणार असून, याअंतर्गत नगरपालिकांना मोठा निधी देऊन विकासकामे करण्यासाठीची योजना प्रस्तावित आहे. ही योजना अमलात आल्यानंतर त्यामध्ये चिखली नगरपालिकेचा प्राधान्याने समावेश करून शहराच्या विकासासाठी मोठा निधी उपलब्ध करून देणार असल्याची ग्वाही राज्याचे कृषी आणि फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली.चिखली नगरपालिकेच्यावतीने वैशिष्ट्यपूर्ण योजनेंतर्गत राजाभाऊ बोंद्रे नगर परिषद माध्यमिक आणि उर्दू माध्यमिक विद्यालयाच्या ५.५० कोटी रुपये खर्चून पूर्ण करावयाच्या इमारतीचे आणि दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ४ कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन ना. भाऊसाहेब फुंडकर यांच्या हस्ते २९ जुलै रोजी पार पडले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष प्रिया कुणाल बोंद्रे होत्या. तर विशेष अतिथी म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे, चिखली अर्बनचे अध्यक्ष सतीश गुप्त उपस्थित होते. यावेळी सुरेशआप्पा खबुतरे, अ‍ॅड. विजय कोठारी, संजय चेके पाटील, अ‍ॅड. मंगेश व्यवहारे, भाऊसाहेब लाहोटी, सुहास शेटे, काशिनाथआप्पा बोंद्रे, सुरेंद्र पांडे, रामकृष्ण शेटे, प्रेमराज भाला, रामदास देव्हडे, सत्यनारायण लढ्ढा, राजाभाऊ खरात, अशोक अग्रवाल, कुणाल बोंद्रे, डॉ. प्रतापसिंग राजपूत, सुधाकर काळे, हाजी पाशुसेठ, शेख अनिस, अलका देशमुख, शकुंतला बाहेकर, रामदास निमावत, राजेंद्र व्यास, किसनराव देव्हडे, कैलास शर्मा, सुधीर तांबट, सुदर्शन भालेराव, सुनीता भालेराव, मुरलीधर भालेकर, डिगांबर पवार, रवी शालेशा, रणजित शालेशा, मुरलीधर चौधरी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने कोणताही पक्षीय अभिनिवेश न ठेवता जिल्ह्याला मिळालेल्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गतच्या निधीचे वाटप करताना सर्व नगरपालिकांना समान न्याय देण्याचा प्रयत्न केला. आतापर्यंत मागे ठेवल्या गेलेल्या आणि अन्याय झालेल्या नगरपालिकांना प्राधान्याने या निधीचे वाटप केले. वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या निधीचे वाटप करताना चिखली शहरातील नगरपालिकेच्या या शाळेच्या इमारतीची झालेली दुर्दशा पाहता तत्काळ साडेपाच कोटींचा निधी मंजूर केला. आता नगराध्यक्ष आणि त्यांच्या सहकाºयांनी या निधीतून शहराच्या वैभवामध्ये भर घालणारी राजाभाऊ बोंद्रे नगर परिषद माध्यमिक आणि उर्दू माध्यमिक विद्यालयाची इमारत उभी करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. दरम्यान, चिखली नगर पालिकेतील काँग्रेसची मक्तेदारी संपवून जनतेने भरघोस बहुमतासह भाजपाच्या ताब्यात नगर पालिका दिल्याने येत्या काळामध्ये या नगर पालिकेला विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील यावेळी भाऊसाहेब फुंडकर यांनी दिली.भाजपा जिल्हाध्यक्ष धृपदराव सावळे यांनी नगर पालिका निवडणुकीच्या दरम्यान जनतेसमोर सादर केलेल्या जाहीरनाम्यातील तरतुदींचा अभ्यास करून त्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवक आणि भाजपाच्या सर्व पदाधिकाºयांनी कंबर कसून कामाला लागावे, असे आवाहन केले. कार्यक्रमाला तहसीलदार मनीष गायकवाड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, न.प. उपाध्यक्ष वजीराबी शे. अनिस, गटनेते प्रा.डॉ. राजू गवई, विरोधी पक्षनेते अ. रफिक, सभापती मंगला झगडे, गोविंद देव्हडे, सुदर्शन खरात, अर्चना खबुतरे, विमल देव्हडे, डॉ. प्रकाश शिंगणे, विजय नकवाल, ममता बाहेती, गोपाल देव्हडे, शालिनी थोरात, नामदेव गुरुदासाणी, रेवती कुळकर्णी, हंसाबाई अतार, पंडितराव देशमुख, अनुप महाजन, शमीमबी शे. राजू, दीपक खरात, प्रभावती एकडे, सुनीता शिंगणे, अ. रऊफ अ. मजीद, मो. आसिफ मो. शरीफ, संगीता गाडेकर, विलास कंटुले, सुनील कासारे आदींची यावेळी उपस्थिती होती.