शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

चोरून फोटो काढणा-यास बदडले!

By admin | Updated: November 5, 2015 01:42 IST

देऊळगाव येथील प्रकार; ४५ वर्षीय व्यक्तीने चोरून काढले फोटो.

देऊळगावराजा (जि. बुलडाणा) : आपल्या आईसोबत १६ वर्षीय मुलगी दुकानात किराणा सामान खरेदी करीत असताना ४५ वर्षीय व्यक्तीने चोरून तिचे फोटो काढले. हा प्रकार सदर मुलीच्या लक्षात येताच तिने आईला सांगितल्यानंतर त्या व्यक्तीची मुलीच्या आईने चपलेने चांगलीच धुलाई केली. हा प्रकार समजताच उपस्थित तरुणांनीसुद्धा त्याला बदडून काढले. हा प्रकार शहरातील नगरपालिका वाचनालयाच्या मागे असलेल्या किराणा दुकानासमोर बुधवारी दुपारी घडला. बुधवारी दुपारी एक १६ वर्षीय मुलगी आईसोबत पार्श्‍वनाथ भवनासमोर असलेल्या किराणा दुकानात सामान खरेदीसाठी आली होती. दुकानाच्या पायर्‍यावर एका नामांकित कंपनीचे फिल्ड ऑफिसर महाशय उभे होते. आपल्या वयाचे व पदाचे भान न ठेवता त्याने आपल्या विकृत मनोवृत्तीचे दर्शन घडवत आपल्याजवळील अँन्ड्रॉइड मोबाइलच्या कॅमेर्‍याने त्या मुलीचे फोटो काढले. आपल्याला कुणी बघितले नाही, या भ्रमात हे महाशय होते; मात्र त्या मुलीच्या चाणाक्ष नजरेने ही बाब हेरली व लगेच आपल्या आईला सांगितले. आईच्या रागाचा पारा चढताच त्यांनी फिल्ड ऑफिसरच्या हातातील मोबाइल हिसकावून घेतला आणि त्याला जाब विचारला. हा गोंधळ बघून तेथे काही युवक जमा झाले. त्या युवकांनी त्याच्या मोबाइलची गॅलरी तपासली असता, सदर मुलीचे तीन फोटो आढळून आले. तरुणांनी विकृत मनोवृत्तीच्या महाशयांना चांगलाच प्रसाद दिला. या घटनेनंतर त्याला पोलीस ठाण्यात नेण्यात आले. तिथे मोबाइलमधील तीन फोटो पोलिसांनी डीलीट करून मेमरी कार्ड ताब्यात घेतले. या प्रकरणात मुलीच्या आईने फिर्याद न दिल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही., मात्र पोलिसांनी संबंधित व्यक्तीला समज दिली.