शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
3
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
4
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
5
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
6
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
7
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
8
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
9
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
10
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
11
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
12
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
13
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
14
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
15
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
16
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
17
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
18
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
19
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
20
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यातील ६0 रेतीघाटांना परवानगी

By admin | Updated: January 7, 2016 02:16 IST

गौण खनिज उत्खननाच्या दुस-या टप्प्यात २४ घाटांच्या लिलावाची शक्यता.

खामगाव: सप्टेंबर २0१५ मध्ये रेतीघाटांची मुदत संपल्यानंतर जिल्ह्यातील रेतीघाटांच्या रखडलेल्या लिलाव प्रक्रियेने आता वेग घेतला आहे. दरम्यान, पर्यावरण विभागाने जिल्ह्या तील ८६ पैकी ६२ रेतीघाटांच्या लिलावास परवानगी दिली आहे. या रेतीघाटांपैकी ६0 घाटांचाच पहिल्या टप्प्यात जानेवारी महिन्याच्या १0 ते १२ तारखेदरम्यान ऑनलाइन लिलाव होत आहे. दुसरीकडे अवैध गौण खनिज उत्खनन आणि रेती उत्खननप्रकरणी जिल्हाधिकारी कार्यालयातील गौण खनिज विभागाने नोव्हेंबर अखेरपर्यंंंत ६१ लाख २४ हजार १0 रुपयांचा दंड वसूल केला आहे. जिल्ह्यातील ८६ रेतीघाटांच्या लिलावासंदर्भात पर्यावरण विभागाकडे गौण खनिज विभागाने ऑक्टोबर-नोव्हेंबर २0१५ दरम्यान परवानगी मागितली होती. त्यानुषंगाने उशिरा का होईना, पर्यावरण विभागाने प्रस्तावित ८६ पैकी ६२ रेतीघाटांतून उपसा करण्यास परवानगी देताना पर्यावरणास त्यामुळे काही धोका नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. मुळात डिसेंबर २0१५ मध्येच या रेतीघाटांचा लिलाव अपेक्षित होता; परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे ही प्रक्रिया आता जानेवारी २0१६ च्या दुसर्‍या आठवड्यात पूर्णत्वास जात आहे. डिसेंबर महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात जिल्ह्यातील ६२ रेतीघाटांचा लिलाव होण्याची अपेक्षा होती; मात्र वेळेत पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील महत्त्वपूर्ण बैठकीत त्यासंदर्भात निर्णय न झाल्याने ही प्रक्रिया रखडली होती. गतवर्षी लिलाव झालेल्या रेतीघाटांतून उपसा करण्याची मुदत ३0 सप्टेंबर २0१५ ला संपुष्टात आली होती. त्यामुळे पूर्णा नदीकाठासह खडकपूर्णा, वानसह जळगाव जामोद तालुक्यातील नद्यांमधून अवैधरीत्या रेतीचे उत्खनन वाढले होते. याबाबत ओरड वाढल्याने गौण खनिज विभागाने तथा महसूल विभागाने जिल्ह्यात कारवाईचे सत्र अवलंबले होते. परिणामी नोव्हेंबर महिन्यात ११२ प्रकरणांमध्ये कारवाई करून १३ लाख ८४ हजार २५0 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. नांदुरा व शेगाव तालुक्यात अनुक्रमे ४६ व १८ प्रकरणांमध्ये कारवाई करीत ६ लाख ६१ हजार ६५0 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.