शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

लोकवस्तींना धोका!

By admin | Updated: October 24, 2016 02:50 IST

वर्षभरात १0७ शेतक-यांवर पशू हल्ले

बुलडाणा, दि. २३- गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील वनक्षेत्राला लागून असलेल्या लोकवस्तीतील मनुष्यांवर वन्य प्राण्यांकडून हल्ले झाल्याच्या घटना पुढे येत आहेत. मागील वर्षभराचा आढावा घेतला असता, तब्बल १0७ वेळा हिंस्र पशूंकडून मनुष्यांवर हल्ला करण्यात आला आहे. पशू हानी, पीक हानी व मनुष्य हानी मोठय़ा प्रमाणात झाली.बुलडाणा, खामगाव, मोताळा, मेहकर, लोणार या तालुक्याला लागून मोठी वनसंपदा आहे. या जंगलामध्ये विविध वन्य प्राणी व हिंस्र श्‍वापदे आढळतात. बर्‍याच वेळा वन्य प्राणी अन्न व पाण्याच्या शोधात वस्त्याकडे येत आहेत. शिवाय सध्या कोणतेही जंगल वन्य प्राण्यांसाठी सुरक्षित राहिले नाही. वन्य प्राण्यांच्या हक्काच्या व सुरक्षित असलेल्या जंगलात मानवी हस्तक्षेप मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे. परिणामी वनक्षेत्रानजिकच्या मानवी वस्तीमध्ये शेतकरी, पाळीव प्राण्यांवर वन्य प्राण्यांकडून प्राणघातक हल्ला होत आहे. बिबट, रानडुक्कर, अस्वल, कोल्हा, लांडगा, तडस या हिंस्र प्राण्यांकडून गिरडा, मोताळा, रोहिणखेड, नळकुंड, खडकी, धामणगाव बढे, खांडवा, कुर्‍हा, कोर्‍हाळा, डोंगरखंडळा, वरवंड पळसखेड भट, दहीद बु., गोंधनखेड, बिरसिंगपूर, हतेडी, पळसखेड, केळवद, नाईक उंद्री गावातील शेतकरी व त्यांच्या जनावरांवर हल्ले झाले आहेत.अस्वलाचा दहशत कायमगेल्या अनेक दिवसांपासून डोंगरखंडाळा, वरवंड या भागामध्ये अस्वलाने हैदोस घातला आहे. यात दोन महिन्यात पाच शेतकर्‍यांना जीव गमवावा लागला. यामुळे येथील भागामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी अस्वलाचा शोध घेत आहेत, तरी सुद्धा वन विभागाला अस्वलाचा शोध लागत नाही. यासाठी शासनाने या अस्वलाचा शोध घेऊन बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.विजेची कुंपणे जनावरांच्या जीवावरशेतकर्‍यांच्या शेतातील पिकांचे हे वन्य प्राणी प्रचंड नुकसान करीत आहेत. शेतीतील पीक वाचविण्यासाठी मग शेतकरी विविध तंत्राचा वापर करतात. यातून प्राण्यांच्या जीवित्वाला धोका होतो. पिंप्री गवळी, धाड, पिंपळगाव सैलानी, चांडोळ, डोंगरखंडाळा, वरवंड, मोताळा आदी भागात वर्षभरात २५ वन्य प्राण्यांचा विजेच्या ध क्क्याने मृत्यू झाला.बोरखेड परिसरात शिकारी टोळी सक्रियरानडुकरांची हत्या करणारी शिकारी टोळी सक्रिय झाली असून, वन्य जीव विभागाचे दुर्लक्ष होत आहे. बोरखेड, दि. २३- बोरखेड, दानापूर, बल्हाडी, वानखेड परिसरात गेल्या काही दिवसां पासून रानडुकरांची हत्या करणारी शिकारी टोळी सक्रिय झाली आहे. मात्र, याकडे वन्य जीव विभागाचे दुर्लक्ष होत आहे. परिसरातील वसाळी, आलेवाडी या भागातील पाच ते सहा इसम सायंकाळीच्या सुमारास दाखल होतात. ज्या भागात रानडुकरांचा वावर आहे. तेथे बारुदचा फटाका लावून ठेव तात. या बारुदी फटाक्यांना खाद्य पदार्थाचे वेस्टन लावल्या जाते. त्या वासाने ते उकरून खाण्याच्या प्रयत्नात स्पंज बारुदच्या फटाक्याचा स्फोट होऊन रानडुक्कर जायबंदी होते. वेळप्रसंगी रानडुकराचा जबडा फाटून ते मृत्युमुखीदेखील पडते. जायबंदी झालेल्या रानडुकराला ही शिकारी टोळी पोत्यात टाकून घेऊन जाते. परिसरात शिकारी टोळी सक्रिय झाली असेल, तर त्या दिशेने गुप्त माहितीच्या आधारे त्वरित तपास केला जाईल.- एस.झेड. काझीवनपरीक्षेत्र अधिकारी, सोनाळा विभाग