शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
4
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
5
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
7
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
8
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
9
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
10
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
11
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
12
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
13
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
14
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
15
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
16
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
17
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
18
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
19
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
20
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांच्या संख्येत दीडपट वाढ!

By admin | Updated: July 15, 2017 00:08 IST

दवाखाने हाऊसफुल्ल : विविध आजार बळावले, नागरिक हैराण

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : गेल्या काही दिवसांपासून रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली असून, येथील शासकीय सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखाने हाऊसफुल्ल झालेले आहेत. सामान्य रुग्णालयात नेहमीपेक्षा दीडपट अधिक रुग्णांची नोंद दररोज होत असल्याचे आढळून आले आहे.पावसाळी वातावरणाचा परिणाम आरोग्यावर होत असतो. प्रामुख्याने ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशी लहान मुले, महिला व वृद्धांना बदलत्या वातावरणाचा सामना करताना विविध त्रास सहन करावे लागतात. यातूनच जून-जुलै महिन्यात पावसाचे आगमन झाले की, सर्दी, खोकला, ताप, पोटाचे विकार आदी रोग डोके वर काढतात. यावर्षी पाऊस नियमित पडत नसला तरी ढगाळ वातावरणामुळे विविध आजार बळावलेले दिसत आहेत. यामध्ये वरील आजारांसह उलटी, हगवण, व्हायरल फ्लू, हात-पाय दुखणे, अंगदुखी आदींचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. त्यामुळे सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्ये प्रचंड गर्दी दिसून येते. सामान्य रुग्णालयातील बाह्य रुग्ण विभागात एरव्ही ४०० ते ५०० रुग्णांची नोंद दररोज होत असते; परंतु या आठवड्यात सोमवारपासून रुग्णसंख्या ७०० च्या जवळपास राहत असून, यात दीडपट वाढ झालेली दिसते. सोमवारी बाह्यरुग्ण विभागात नोंदणी झालेल्या एकूण रुग्णांची संख्या तब्बल ९५१ होती. तर मंगळवारी ७६८, बुधवारी ७६१, गुरुवारी ५७१ तर शुक्रवारी ६५४ रुग्णांची नोंद झाली. यावरून रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येते. खासगी रुग्णालयांमध्येही रुग्णांची गर्दी दिसत असून घरोघरी ताप, सर्दी, खोकला व इतर रुग्ण आढळून येत आहेत.