मेहकर: ऑल इंडिया चेस फेडरेशन व महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाईन नऊ वर्षाखालील मुलींचे राज्यस्तर बुद्धिबळ स्पर्धेत परी चव्हाणने दुसरा क्रमांक पटकावला आहे़
परी चव्हाणने मुलींच्या नऊ वर्षाखालील वयोगटात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत अनुक्रमे सानवी कुळकर्णी, श्रेया पगारे, वल्लारी किनी, ओवी पावडे, वेदिका पाल, पहारिया खनक, परिधी गांधी, अनिका सोमानी या खेळाडूंना पराभूत केले. नऊपैकी आठ सामने जिंकून तिने राज्यातून दुसऱ्या क्रमांकाचे बहुमान पटकाविला आहे. ही स्पर्धा ऑनलाइन पद्धतीने व झूम व्हिडिओ लिंकद्वारे घेण्यात आली होती. या स्पर्धेतून दोन खेळाडू महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व १३ ते १४ जुलैला होणाऱ्या राष्ट्रीयस्तर बुद्धिबळ स्पर्धेत करणार आहेत. राष्ट्रीय स्तरावर बुलडाणा जिल्ह्याला पोहोचवून बुद्धिबळ खेळात जिल्ह्याचा सन्मान परी चव्हाणने वाढविला आहे.