शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मलकापूर तालुक्यातील जीपीएस प्रणालीचे पंचनामे फोल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 01:12 IST

मलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे.

ठळक मुद्देबोंडअळी नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण प्रशासकीय यंत्रणेद्वारे युद्धपातळीवर काम 

मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झालेल्या बाधित क्षेत्राचा प्रशासकीय यंत्रणेच्यावतीने जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. अनेक शेतकर्‍यांनी शेतातील कपाशी काढली आहे. जीपीएसद्वारे सर्वेक्षण करताना निरंक अहवाल देण्यात येत आहे.कपाशी पिकावर गुलाबी, शेंदरी, बोंडअळी किडीचा प्रादुर्भाव झाल्याने तालुक्यातील १८ हजार २२८ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. ही नैसर्गिक आपत्ती असल्याचे निश्‍चित झाल्याने मलकापूर तालुक्यातील सरसकट बाधित क्षेत्राचे पंचनामे करून दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश शासन स्तरावरून प्रशासनाला देण्यात आले. त्यामुळे महसूल व कृषी विभागाच्यावतीने बाधित क्षेत्राचे शेतशिवारात प्रत्यक्षरीत्या जावून जीपीएस प्रणालीद्वारे पंचनामे सुरू आहेत. आदेश निघून निम्मे दिवस लोटले आहेत. तर आता उर्वरित दिवसात एवढय़ा मोठय़ा क्षेत्राचे पंचनामे कसे करायचे? असा पेच प्रशासकीय यंत्रणेसमोर निर्माण झाला आहे. अद्ययावत तंत्रज्ञान व मनुष्यबळाचा अभाव या बाबीचा मेळ असणे अवघड असून, अशा बिकट परिस्थितीत आता ५-६ दिवसात बाधित क्षेत्राचे पंचनामे करून सदर अहवाल विभागीय आयुक्तांना देणे कृषी विभागाला शक्यच नसल्याचे दिसत आहे. कारण पंचनामे घाईगडबडीत करणे म्हणजे शेतकर्‍यांचा रोष ओढवून घेणे होय. या बाबीची जाण ठेवीत तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकाचा समावेश असलेले संयुक्त पथक पंचनामे करण्यात मग्न आहेत. दरम्यान, अनेक शेतकरी कपाशी उपटणे, त्यावर ट्रॅक्टर फिरवणे अथवा त्या पिकात जनावरे घालणे असे प्रकार करीत आहेत. मग अशावेळी त्या क्षेत्राचे पंचनामे करणे म्हणजे मोठे आव्हानच असून, हे आव्हानही या प्रशासकीय यंत्रणेला स्वीकारावे लागत आहे. या पंचनाम्यानंतर नुकसानाचे निकष व भरपाई कशी मिळणार, ही बाब गुलदस्त्यात आहे. 

बाधित क्षेत्राचे पंचनामे सुरू असून, कपाशी उपटलेल्या क्षेत्राचेही पंचनामे केल्या जातील. अगदी शेवटच्या बाधित शेतकर्‍यांपर्यंत आम्ही पोहोचू. दरम्यान, शेतकरी बांधवांनी धैर्य ठेवीत संयमाने वागून प्रशासकीय यंत्रणेला सहकार्य करावे किंबहूना सद्यस्थितीतही अपेक्षित असे सहकार्य कापूस उत्पादक शेतकर्‍यांकडून मिळतच आहे.- संजय पवारतालुका कृषी अधिकारी, मलकापूर- 

टॅग्स :buldhanaबुलडाणाmalkapur bypassमलकापूर बायपासcottonकापूस