शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाबाधित लहान मुलांसाठीही ‘जनआरोग्य’ योजनेत पॅकेज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:44 IST

Buldhana News : पॅकेज अंतर्गत कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रसंगी लहान मुलांना फटका बसण्याची शक्यता पाहता ‘जनआरोग्य’ योजनेत लहान मुलांसाठी श्वसनाशी संबंधित पॅकेज देण्यात आले आहे. त्यामुळे या पॅकेज अंतर्गत कोरोनाबाधित लहान मुलांवर उपचार करण्याची सोय उपलब्ध झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान जवळपास ४५ मुलांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.दुसरीकडे कोरोनाची संभाव्य तिसरी लाट थोपविण्यासाठी आरोग्य विभागाने हालचाली सुरू केल्या आहेत. कोविड समर्पित रुग्णालयात लहान मुलांसाठी २० खाटांचा एक कक्ष उभारण्यासोबतच जनआरोग्य योजनेतंर्गत लहान मुलांच्या एका खासगी रुग्णालयासही कोरोना उपचारासाठी मान्यता देण्यात आली असल्याची माहिती जनआरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. विवेक सावके यांनी दिली.जिल्ह्यात जनआरोग्य योजनेतंर्गत मोठ्या व्यक्तींच्या कोविड उपचारासाठी नुकतीच सहा खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. गेल्या १४ महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतंर्गत  जिल्ह्यातील १०४३ बाधितांवर मोफत उपचार करण्यात आले आहे. दरम्यान या योजनेबाबत योग्य पद्धतीने मधल्या काळात जनजागृती न झाल्यामुळे अनेकांना योजनेची फारशी माहिती नव्हती. त्या पार्श्वभूमीवर जनआरोग्य योजनेचे ल्हा समन्वयक यांनी अनुषंगिक माहिती दिली. मोठ्या माणसांप्रमाणेच लहान मुलांच्या कोरोनावरही उपचार करण्यासाठी सहा प्रकारचे पॅकेज उपलब्ध असून किमान २० हजार ते दीड लाख रुपयापर्यंतचा इलाजही यामध्ये मोफत हाेऊ शकतो असे ते म्हणाले. त्यातच बुलडाणा जिल्हा हा अवर्षणग्रस्त जिल्ह्यामध्ये मोडत असल्याने या योजनेचा लाभ शासनाच्या १६ प्रकारच्या ओळखपत्र तथा अन्य कागदपत्राच्या आधारे घेता येतो. व्हॉटसॲपवर सुद्धा कागदपत्रे दिल्यास रुग्णाचा योजनेत समावेश केला जाऊ शकतो. खामगाव येथील डॉ. सोनटक्के यांनीही या योजनेत  ६ पॅकेज   असल्याचे सांगितले.

८ ते १० वर्ष वयोगाटील मुलांची संख्या अधिकजिल्ह्यात दुसऱ्या लाटेदरम्यान ८ ते १० वर्ष वयोगटातील मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. ७ ते ८ महिन्याच्या लागण झालेल्या मुलांवर बुलडाणा आणि खामगाव येथे  उपचार करण्यात आले असल्याचे डॉ. सोनटक्के म्हणाले. बुलडाणा व खामगाव शहर मिळून आतापर्यंत जवळपास ४५ मुलांमध्ये कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या