शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

तीन हजार शेतकर्‍यांपैकी केवळ १३0 शेतकर्‍यांना लाभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 01:15 IST

बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे.  त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी  नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर्‍यां पैकी केवळ १३0 शेतकरीच या फॉर्ममधील अटींची पूर्तता करू शकले आहेत. त्यामुळे आता  पात्र-अपात्रेच्या निकषात कृषी विभाग नाहक वेठीस धरला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

ठळक मुद्देमलकापूर तालुक्यात बोंडअळीच्या प्रादुर्भावाने कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान 

मनोज पाटील। लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर: बोंडअळीच्या प्रादुर्भावाने यंदा कपाशी पिकाचे मोठय़ा प्रमाणात  नुकसान झाले आहे.  त्या धर्तीवर कृषी विभागाकडून बाधित क्षेत्राचा ‘जी-फॉर्म’ भरून घेतल्या जात आहे. कपाशी  नुकसानीचे पंचनामेही युद्धपातळीवर सुरू आहेत. दरम्यान, जी फार्म भरलेल्या ३ हजार शेतकर्‍यां पैकी केवळ १३0 शेतकरीच या फॉर्ममधील अटींची पूर्तता करू शकले आहेत. त्यामुळे आता  पात्र-अपात्रेच्या निकषात कृषी विभाग नाहक वेठीस धरला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुलाबी-शेंदरी बोंडअळीने कापूस उत्पादकांवर संक्रांत आणली आहे. या अळीच्या प्रादुर्भावाने उत् पन्नामध्ये ६५ टक्के घट आणल्याने शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडले आहे. त्यामुळे मलकापूर  तालुक्यातील १९ हजार २२८ हेक्टरवरील कापूस सद्यस्थितीत काळवंडला आहे. ७0 टक्के का पूस पीक अखेरच्या घटका मोजत आहे.  पंचनाम्यादरम्यान एका झाडाच्या ३५ कैर्‍यांपैकी ३0- ३१ तर २८ कैर्‍यांपैकी २४-२५ कैर्‍या बाधित आढळत आहेत. या रोगट झाडांचा इतर पिकांवर  परिणाम होऊ नये व आता कपाशीचे उत्पन्नच मिळणार नसल्याने या पिकात ट्रॅक्टर फिरवण्यावर  शेतकरी भर देऊ लागले आहेत. या जी फॉर्मसोबत बियाणे खरेदी बिल, लेबल व वापरलेले  आवेष्टन साहित्य अर्थात थैली किंवा डबा आदी अटींची पूर्तताही करावी लागत आहेत; मात्र कृषी  विभागाकडे प्राप्त ३ हजार अर्जांपैकी केवळ १३0 अर्जदारच या अटींची पूर्तता करू शकले  आहेत. ही पूर्तता करण्यासाठी शेतकरी वर्गाची धावपळ सुरू झाली आहे; मात्र सात-आठ  महिन्यांआधी अथवा पेरणीदरम्यान खरेदी केलेल्या बियाण्यांच्या पावत्या शोधूनही घरात सापडत  नाहीत. अनेकांना तर पेरणीच्या घाईत पावती घेतली की नाही, हेच आठवत नाही. लॉट नंबर काय  असतो, हे माहिती नाही. अशा समस्येने त्रस्त शेतकरी कृषी सेवा केंद्र व कृषी विभागाकडे चकरा  मारताना दिसत आहे. त्यातच या कपाशी नुकसानीस शासन साशंकता कायम आहे. महत्त्वाचे  म्हणजे नुकसान भरपाईसंदर्भात शासनाचे कोणतेही परिपत्रक अद्यापपावेतो जारी झाले नसल्याच्या  बाबीला कृषी विभागानेही दुजोरा दिला आहे. मात्र नुकसानीबाबत माहिती गोळा करण्याचे आदेश असल्याचे अधिकारी वर्ग सांगत असल्याने  पुढील काळात पात्र-अपात्रतेच्या फेर्‍यात कृषी विभाग वेठीस धरल्या जाऊ शकतो.