शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

खासगी ट्रॅव्हल्समध्ये मोकळे रान; ई-पासही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 09:58 IST

Buldhana News : खासगी ट्रॅव्हल्सला एकप्रकारे या निर्बंधाच्या काळात मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कठोर निर्बंधांच्या काळात खासगी ट्रॅव्हल्सद्वारेही प्रवाशांची बिनदिक्कत वाहतूक  होत आहे. प्रवाशांकडे ना ई-पास असते, ना त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के मारलेले असतात. त्यामुळे खासगी ट्रॅव्हल्सला एकप्रकारे या निर्बंधाच्या काळात मोकळे रान मिळाले असल्याचे चित्र आहे.  पोलिसांनी मध्यंतरी चार खासगी वाहनांवर कारवाई केली आहे. बुलडाणा पालिकेनेही १८ मे रोजी दोन ट्रॅव्हल्सला दहा हजार रुपयांचा दंड केला आहे. मात्र, याउपरही बुलडाणा जिल्ह्यातून पुणे, सुरत, मुंबईला खासगी प्रवाशी बसगाड्या धावत आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनानेही याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण आहे. सध्या मलकापूर-पुणे, सुरत-मेहकर, जळगाव जामोद-पुणे आणि मलकापूर येथून चार खासगी ट्रॅव्हल्स जिल्ह्याबाहेर जात आहेत. त्यामुळे एकप्रकारे या खासगी प्रवाशी वाहतूक करणाऱ्या बसगाड्या या प्रसंगी सुपरस्प्रेडरची भूमिका निभावत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. 

बुलडाण्यातील गाड्या बंदबुलडाणा जिल्हा बस असोसिएशन अंतर्गत बुलडाण्यातून आठ ट्रॅव्हल्स पूर्वी धावत होत्या. मात्र ई-पासची समस्या असल्याने सध्या ट्रॅव्हल्स चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे तूर्तास आमच्या गाड्या आम्ही बंद ठेवल्या असल्याचे बुलडाणा जिल्हा बस असोसिएशनचे पदाधिकारी धनंजय भालेराव यांनी सांगितले. असे असले तरी अन्य ठिकाणांहून ट्रॅव्हल्स धावत आहेत.

प्रवाशांकडेही नसते वैद्यकीय प्रमाणपत्रट्रॅव्हल्सद्वारे प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडे ना आरटीपीसीआरचा निगेटिव्ह टेस्ट रिपोर्ट असतो किंवा त्यांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के असतात. त्यातच ३० प्रवाशांचा शासन टॅक्स घेत असले तरी प्रत्यक्षात १५ प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी दिली जाते. त्यामुळेही बऱ्याचदा अनेक ट्रॅव्हल्समध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी दिसून येत आहेत.

ना मास्क, ना सॅनिटायझरसध्या दररोज ८ ट्रॅव्हल्स सुरत, पुणे, मुंबईसाठी धावत आहेत. यातील प्रवाशांकडे ना मास्क असतो, ना बसचालकांकडे सॅनिटायझर असते. प्रवाशांच्या हातावरही क्वारंटाईनचे शिक्के मारले जात नाहीत. आरटीपीसीआर टेस्ट निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र तर दूरच आहे. 

ई-पास कोणाकडेही नाही बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास ८ ट्रॅव्हल्स धावतात. सुरत व पुण्यावरूनही दोन येतात.  या ट्रॅव्हल्सवाल्यांकडे ई-पास नसतो. मुळात बुलडाण्यातून या वाहनांना ई-पासच दिल्या जात नाहीत. मात्र, त्याउपरही या ट्रॅव्हल्स धावत आहेत. कारवाई करण्याची गरज आहे.

पाच ट्रॅव्हल्सवर कारवाईगेल्या आठ ते दहा दिवसांत ५ ट्रॅव्हल्सवर बुलडाणा पालिका व पोलीस प्रशासनाने कारवाई करून त्यांच्याकडून जवळपास २५ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. याव्यतिरिक्त अमडापूर येथेही एका ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा