शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना हॉटस्पॉटमधील तीन टक्केच नागरिकांचे लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 11:21 IST

Buldhana Corona Vaccination : ८५ हॉटस्पॉटमधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या २.८९ नागरिकांचेच लसीकरण पूर्ण झाल्याचे वास्तव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यात नियंत्रणात आलेली असली तरी लसीकरणाचा वेग तुलनेने मंद असल्याचे चित्र आहे. प्रामुख्याने कोरोना हॉटस्पॉट बनलेल्या भागात हा वेग वाढविण्यावर जोर देण्याची अवश्यकता असून जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात असलेल्या ८५ हॉटस्पॉटमधील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अवघ्या २.८९ नागरिकांचेच लसीकरण पूर्ण झाल्याचे वास्तव आहे.त्यामुळे प्रामुख्याने कोरोनाच्या हॉटस्पॉट भागात लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्याची गरज आहे. बुलडाणा जिल्ह्यात शहरी भागात ३३ तर ग्रामीण भागात ५२ हॉटस्पॉट आहे. या ८५ हॉटस्पॉटमध्ये अलिकडील काळात ५५० कोरोना बाधीत तपासणीदरम्यान आढळून आले आहेत. शहरी व ग्रामीण मिळून या हॉटस्पॉटची एकूण लोकसंख्या ४ लाख ४२ हजार ७९० आहे. यापैकी केवळ ५१ हजार १९६ जणांची लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १२ हजार ८३१ जणांनीच आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. त्यामुळे या हॉटस्पॉटमध्ये लसीचे दोन्ही डोस घेणाऱ्यांचे प्रमाण अवघे २.८९ टक्के आहे.त्यातच आता ‘डेल्टा प्लस’ चा धोका वाढला असून तिसऱ्या लाटेची भीती आहे. ही तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. त्यामुळे हॉटस्पॉट मध्ये लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज निर्माण झाली आहे. दुसरीकडे सध्या लसीचे डोस आठवड्यातून किमान तीन वेळा उपलब्ध होत असल्याने येत्या काळात हा वेग वाढण्यास मदत होईल, असे लसीकरण अधिकारी डॉ. गोफणे यांनी स्पष्ट केले आहे.काेराेनाची तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता लसीकरणाची गती वाढवण्याची गरज आहे. 

एकूण लसीकरण ५.९८ टक्केजिल्ह्याची लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार २५ लाख ६० हजारांच्या आसपास आहे. यापैकी २१ लाख ४६ हजार ९५ नागरिकांच्या लसीकरणाचे उदिष्ठ ठेवण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख २८ हजार ४८४ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहे. म्हणजे एकुण उदिष्टाच्या तुलनेत जिल्ह्यात अवघ्या ५.९८ टक्के नागरिकांचे लसीकरण पुर्ण झाले आहे. मात्र हॉटस्पॉटमध्ये हे प्रमाण अवघे २.८९ टक्के आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेत जिल्ह्यात हॉटस्पॉटवरही लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाCorona vaccineकोरोनाची लस