शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तीन महिने पुरेल एवढीच वैरण!

By admin | Updated: November 13, 2015 01:54 IST

अवर्षणसदृश स्थितीमुळे खामगाव तालुक्यात गुरांच्या वैरणाचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनण्याची शक्यता.

नाना हिवराळे /खामगाव : अवर्षणसदृश स्थितीमुळे खामगाव तालुक्यात गुरांच्या वैरणाचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनण्याची शक्यता असून, सध्या मार्चपर्यंंत पुरेल एवढीच वैरण उपलब्ध आहे. तालुक्यात दरवर्षी दोन लाख मेट्रिक टन चार्‍याचे उत्पादन अपेक्षित असते; मात्र यावर्षी अवर्षणसदृश स्थितीमुळे ५0 हजार मेट्रिक टन चार्‍याचे उत्पादन कमी झाले आहे. त्यामुळे तालुक्यातील ८६ हजार गुरांच्या वैरणाचा प्रश्न येत्या काळात निर्माण होणार आहे. तालुक्यात यावर्षी चार्‍याच्या उत्पादनामध्ये ३0 टक्के घट झाली आहे. परिणामी एक लाख ४९ हजार ५८९ मेट्रिक टन चाराच तालुक्यात उपलब्ध झाला आहे. खामगाव तालुक्यात १४८ गावे असून, त्यापैकी १३२ गावे ही आबाद तर १६ गावे उजाड आहेत. १९ व्या पंचवार्षिक पशुगणनेनुसार खामगाव तालुक्यात ७0 हजार हजार ४१४ मोठी गुरे तर १६ हजार २५६ लहान अशी ८६ हजार ३९८ गुरे तालुक्यात आहेत. त्यांना दरवर्षी साधारणत: दोन लाख तीन हजार मेट्रिक टन चार्‍याची गरज भासते. अवर्षणाच्या स्थितीमुळे तालुक्यात यावर्षी खरीप व रब्बी हंगामातील शेती उत्पादनातून प्रत्यक्षात एक लाख ४९ हजार ५८९ मेट्रिक टन चाराच उपलब्ध होत आहे. त्यामुळे तालुक्यातील चारा उत्पादनात ३0 टक्के घट गृहित धरण्यात आल्याने मार्च अखेरपर्यंंतच उपलब्ध चारा तालुक्यात पुरणार आहे. त्यातच पडीक जमिनीमधून तालुक्यात दहा हजार ९७५ मेट्रिक टन चारा उपलब्ध होण्याचा प्रशासनाचा अंदाज होता; मात्र अवर्षणाच्या स्थितीमुळे हा चाराही उपलब्ध होऊ शकलेला नाही. त्यामुळे वैरणाचा प्रश्न उन्हाळ्यात गंभीर बनण्याची साधार भीती व्यक्त होत आहे. एकीकडे शेतीपूरक व्यवसाय करण्याबाबत शासन स्तरावरून प्रोत्साहन दिले जाते; मात्र गेल्या दोन वर्षापासूनची अवर्षणाची स्थिती पाहता दुग्धोत्पादनाचा जोडधंदा करणार्‍या शेतकर्‍यांसमोर विपरीत परिस्थितीमुळे वैरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. साधारणत: मोठय़ा गुरांसाठी दररोज सहा किलो आणि छोट्या गुरांसाठी साधारणत: तीन किलो या प्रमाणे चारा तालुक्यात लागतो. उत्पादनातच घट झाल्याने वैरणाचा प्रश्न आहे. त्यामुळे गुरे जगवणे शेतकर्‍यांना जिकिरीचे ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. परिणामी खरिपात कमी झालेले वैरणाचे उत्पादन रब्बीतही कितपत भरून निघेल, हाही एक प्रश्न आहे.