शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आॅनलाइन पीक विम्याचा पहिलाच प्रयोग ‘फेल’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 00:59 IST

ब्रम्हानंद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची आॅनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये शनिवारपासून केवळ प्रस्ताव आणि पैसे स्वीकारणे सुरू आहे. पीक विम्याची ३१ जुलै अंतिम मुदत असून, आतापर्यंत केवळ ३५ हजार शेतकºयांचा पीक विमा भरण्यात आला आहे; मात्र आॅनलाइनचा हा पहिलाच प्रयोग ‘फेल’ गेल्याने प्रशासन अडचणीत ...

ठळक मुद्दे बुलडाणा जिल्ह्यात केवळ ३५ हजार शेतक-यांनी भरला पीक विमा बँकामध्ये केवळ प्रस्ताव, पैसे घेणे सुरू

ब्रम्हानंद जाधव ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: प्रधानमंत्री पीक विमा भरण्याची आॅनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने जिल्ह्यातील सर्व बँकांमध्ये शनिवारपासून केवळ प्रस्ताव आणि पैसे स्वीकारणे सुरू आहे. पीक विम्याची ३१ जुलै अंतिम मुदत असून, आतापर्यंत केवळ ३५ हजार शेतकºयांचा पीक विमा भरण्यात आला आहे; मात्र आॅनलाइनचा हा पहिलाच प्रयोग ‘फेल’ गेल्याने प्रशासन अडचणीत सापडले असून, शेतकºयांनाही पीक विम्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.जिल्ह्यातील खरीप ज्वारी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस पिकाला दरवर्षी विमा लागू करण्यात येतो. त्यासाठी पेरणीनंतर जवळपास १५ दिवसांनी पीक विमा भरण्याची प्रक्रिया सुरू होते.दरवर्षी पीक विमा भरण्यासाठी सर्व प्रक्रिया आॅनलाइन असल्याने शेतकºयांना कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागत नाही. तसेच मुदतीच्या आत सर्व कागदपत्रे प्रशासनाकडे जमा केली जातात; परंतु सर्वत्र आॅनलाइन कारभार चालत असल्याने शेतकºयांचा पीक विमाही आॅनलाइन प्रणालीतूनच भरण्याचे आदेश शासनाने दिले होते. शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी बँकांमध्ये होणारी गर्दी टाळता यावी व शेतकºयांना अर्ज भरण्यास सुलभता व्हावी याकरिता पीक विमा हप्ता सीएससीमार्फत आॅनलाइन पद्धतीने स्वीकारण्यास सुरुवात करण्यात आली होती; परंतु आॅनलाइनची ही प्रक्रिया वारंवार विस्कळीत होत असल्याने जिल्ह्यात केवळ ३५ हजार कर्जदार व बिगर कर्जदार शेतकºयांना आतापर्यंत पीक विमा भरता आला. बाकीचे शेतकरी पीक विमा भरण्यासाठी रांगेतच ताटकळत आहेत.शेतकºयांना पीक विमा भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असल्याने व आॅनलाइन प्रक्रिया बंद पडल्याने नाबार्डच्यावतीने सर्व बँकाना आॅफलाइन पद्धतीने विमा हप्ता भरायच्या सुचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात शनिवारपासून पीक विम्यासाठी प्रस्ताव व पैसे स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे; परंतु त्यासाठी बँकांकडेसुद्धा यंत्रणा तोकडी असल्याने शेतकरी विमा भरण्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.पीक विमा भरण्यासाठी यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाइनचा प्रयोग वापरण्यात आला; मात्र पहिलाच फसला. त्यामुळे प्रशासनासह शेतकरी अडचणीत सापडले आहे.बँका सापडल्या अडचणीतआॅफलाइन विमा घेण्याबाबत वरिष्ठांनी बँकांना सूचना दिल्या असल्या, तरी या वेबसाइटचे आॅफलाइन सर्व्हरदेखील अद्याप बँकेत डाउनलोड झालेले नाही. तसेच सध्या पीक कर्ज नवे-जुने करणे, शेतकºयांना दहा हजारांची तातडीचे कर्ज आणि विमा भरून घेण्याची संपत आलेली मुदत यामुळे शेतकरी सर्वच कामे घेऊन बँकेत बसले आहेत; मात्र बँकांमधील अपुरे मनुष्यबळ, खंडित होणारा वीजपुरवठा, यंत्रणांचा अभाव अशा अडचणींचा सामना बँकांना करावा लागत आहे. तसेच एकाच वेळात आलेल्या अनेक कामांमुळे बँक कर्मचाºयांची डोकेदुखी वाढली आहे.पीक विमा भरण्याची आॅनलाइन प्रक्रिया विस्कळीत झाली. तसेच अंतिम मुदत जवळ आल्याने शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांना पीक विम्याचे प्रस्ताव आॅफलाइन घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- सुभाष बोंदाडेजिल्हा समन्वयक, नाबार्ड, बुलडाणा.