शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन सात-बारामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात पाचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:08 IST

बुलडाणा  : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे.

ठळक मुद्दे ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसितदुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला ऑनलाइन

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा  : केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया लँड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन प्रोगाम अंतर्गत शेतकर्‍यांना शेतीविषयक सर्व रेकॉर्ड ऑनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी ई-फेरफार, ई-चावडी सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यानुसार राज्यात ई-फेरफार आज्ञावलीद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयात झालेल्या दस्ताची नोंद तलाठी रेकॉर्डला ऑनलाइन होत आहे. यामध्ये युटिलिटीचा उपयोग करून हस्तलिखित सात-बारा व ऑनलाइन सात-बारा तंतोतत जुळविण्याचे जिल्ह्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे जिल्हा राज्यामध्ये पाचव्या क्रमांकावर असून, जिल्ह्याचे एडिट मॉड्युलचे ९९.६१ टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी ललित वराडे, उपजिल्हाधिकारी (महसूल)  नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी नरेंद्र टापरे आदी उपस्थित होते. ई-चावडीची माहिती देताना जिल्हाधिकारी म्हणाले, शेतीविषयक तलाठी रेकॉर्डला असलेले १ ते २१ गाव नमुने ऑनलाइन अद्ययावत होणार आहेत. त्यासंबंधीच्या नोंदीसुद्धा ऑनलाइन जतन करून ठेवल्या जाणार आहेत. चावडी वाचन मोहिमेद्वारे सात-बारा तंतोतंत जुळविण्याचे काम करण्यात आले.जिल्ह्यात एकूण ५ लाख ४0 हजार ५५७ ऑनलाइन सात-बारा तंतोतंत आहेत. शेतकर्‍यांना सात-बारा ऑनलाइन परीक्षण करण्यासाठी संकेतस्थळावर पाहता येणार आहे. जिल्ह्यातील १४८५ गावांमध्ये चावडी वाचनाची मोहीम राबविण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान मालगणी, मोताळामधील वाघजाळ व शेगाव तालुक्यातील चिंचोली येथे भेट देण्यात आली असल्याची माहिती यावेळी जिल्हाधिकारी पुलकुंडवार यांनी दिली.