चांडाेळ परिसरात विशेष लसीकरण शिबिर
बुलडाणा : प्राथमिक आरोग्य केंद्र चांडोळअंतर्गत येत असलेल्या इरला, शेकापूर, पांगरखेडसह बोधेगाव येथील नागरिकांचे २३ सप्टेंबर रोजी कोविड लसीकरण करण्यात आले. यामध्ये एकूण सहाशे नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली.
पांदण रस्त्याची दुरवस्था, शेतकरी त्रस्त
सुलतानपूर : गत काही दिवसांपासून हाेत असलेल्या संततधार पावसामुळे सुलतानपूर परिसरातील पांदण रस्त्याची दुरवस्था झाली आहे. पांदण रस्त्यावर माेठ्या प्रमाणात चिखल साचल्याने शेतकऱ्यांना शेतमाल घरी आणताना कसरत करावी लागत आहे. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन पांदण रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी हाेत आहे़
माॅडेल डिग्री काॅलेज येथे हिंदी दिवस साजरा
बुलडाणा : माॅडेल डिग्री काॅलेज बुलडाणा येथे १४ सप्टेंबर राेजी हिंदी विभागाच्या वतीने हिंदी दिवस साजरा करण्यात आला. यावेळी मानद संचालक डाॅ. केदार ठाेसर हे हाेेते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. गुलाबराव साेनाेने उपस्थित हाेते.