शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

अन्न व्यावसायिकांनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:39 IST

जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसायधारक, अन्नपदार्थ साठविणारे गोदाम, हातगाडीवर चहा, ...

जिल्ह्यातील सर्व अन्न पदार्थांचे उत्पादक, वितरक, घाऊक व किरकोळ विक्रेते, हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी व्यवसायधारक, अन्नपदार्थ साठविणारे गोदाम, हातगाडीवर चहा, नाश्ता, पाणीपुरी, भेळपुरी, फरसाण, फळे व भाजीपाला विक्रेते व इतर खाद्य अन्नपदार्थ विक्रेते, भाजी मंडईत असणारे विक्रेते आदींनी परवाना नोंदणीसाठी फॉसकॉस प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीतील अडत विक्रेते, वखार महामंडळ, दूध संकलन केंद्र, घरोघरी दूध घालणारे विक्रेते, हातगाडीवर आईस्क्रीम व थंडपेय, पॉपकॉर्न, खवा, मावा विक्रेते, इतर सर्वप्रकारचे खाद्यपदार्थ विक्रेते यांनी अन्नसुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत परवाना व नोंदणी करणे आवश्यक आहे. फॉसकॉस या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाइन अर्ज करून परवाना व नोंदणी प्राप्त करून घ्यावी, त्यासाठी सेतू किंवा सीएससी केंद्र यांची मदत घेतली जाऊ शकते, अथवा स्वत: ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करून परवाना किंवा नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी या सुविधेचा लाभ घेऊन परवाना व नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.