शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

आता विद्यार्थ्याच्या वजनानुसार राहणार दप्तराचे ओझे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:38 IST

बुलडाणा : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले असून, तसा अहवाल प्रत्येक शाळेने गटशिक्षण अधिकाºयांना द्यावयाचा आहे.

ठळक मुद्देमुख्याध्यापकांना दप्तर तपासण्याचे निर्देशप्रत्येक शाळेला गटशिक्षण अधिका-यांना द्यावा लागेल अहवालनियमांचा भंग करणा-या शाळेवर कार्यवाहीची शक्यता

हर्षनंदन वाघ ।लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी इयत्ता व विद्यार्थ्यांच्या वजननिहाय दप्तराचे वजन किती असावे, याचे निकष ठरविले आहेत. याबाबत मुख्याध्यापकांना दप्तराचे ओझे तपासण्याचे निर्देश दिले असून, तसा अहवाल प्रत्येक शाळेने गटशिक्षण अधिकाºयांना द्यावयाचा आहे. याबाबत नियमांचा भंग करणाºया शाळेवर कार्यवाहीची शक्यता आहे.मागील काही वर्षात विद्यार्थ्यांच्या वजनापेक्षा दप्तरांचे ओझे विद्यार्थी वाहून नेत होते. त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होत होता. याबाबत वैद्यकीय अधिकाºयांनीही जास्त वजनाच्या दप्तराचा विद्यार्थ्यांच्या शरीरातील विविध अवयवांवर वाईट परिणाम होतो, असा निर्वाळा दिला होता.त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे इयत्तानिहाय वजन व शाळेमध्ये आवश्यक साहित्याचे वजन निश्चित करण्यात आले आहे. विद्यार्थ्याच्या वजनाच्या १० टक्के दप्तराचे वजन अपेक्षित आहे. आवश्यक साहित्याचे वजन, पाण्याची बाटली, खाऊचा डबा, सर्व साहित्य ठेवण्याची बॅग इत्यादींचा त्यात समावेश आहे. प्रत्येक मुख्याध्यापकांनी शाळा स्तरावर तसा अहवाल गटशिक्षणाधिकाºयांना सादर करावयाचा आहे. याबाबत १५ जुलै रोजी संबंधित शाळांना सूचना दिल्या आहेत. लहान मुलांना दप्तरांच्या ओझ्यामुळे चालता येत नाही. दररोज वजन वाहून नेल्यामुळे हाडांचे, मणक्यांचे व पाठदुखींचे अनेक गंभीर आजार जडले आहेत. शाळेत दरदिवशी किमान पुस्तके व साहित्यांचा वापर करावा, अशी पालकांची मागणी होती; परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. शासनाने ही परिस्थिती बदलविण्याकरिता ठोस कार्यवाही केली आहे. याबाबत शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आकस्म्सिक तपासणी मोहीम राबविण्याची शक्यता आहे.दप्तराच्या ओझ्याबाबत तक्त्यातील नोंदीइयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्याचे वजन २०.७ कि.मी.ग्रॅम आहे, तर साहित्यासह दप्तराचे वजन १८८० ग्रॅम असावे, असे तक्त्यांत निर्देशित केले आहे. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे १७८५ ग्रॅम, इयत्ता तिसरी २४०० ग्रॅम, इयत्ता चौथी २६८५ ग्रॅम, पाचवी ३१२५ ग्रॅम, सहावी ३१४१, सातवी ३३५६, आठवी ३४२५ ग्रॅमचा समावेश आहे. इयत्ता पहिली ते इयत्ता आठवीपर्यंत दप्तरात पुस्तके, वह्या कंपासपेटी यांचे वजनाचा समावेश करण्यात आला आहे. यात पहिलीच्या विद्यार्थ्यांना तीन पुस्तके दप्तरात असावी, अशी नोंद तक्त्यात केली आहे.शाळा सुरू झाल्यानंतर अनेक मुख्याध्यापकांना दप्तराच्या ओझ्याबाबत सूचना दिल्या होत्या. उर्वरित मुख्याध्यापकांना लवकरच सूचना देऊन, आवश्यकता भासल्यास मोहीम राबवून कार्यवाही करण्यात येईल.-आर.पी. पवार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, मेहकर.