शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव बाजार समिती संचालकांना नोटीस!

By admin | Updated: December 7, 2015 02:17 IST

२१ डिसेंबरला संचालकांना मिळणार बाजू मांडण्याची संधी.

शेगाव (जि. बुलडाणा): बाजार समितीच्या आर्थिक हितास बाधा पोहोचवल्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांनी संचालकांना कलम ४५ नुसार प्रसंगी बाजार समिती सचिवांसह संचालकांना नोटीस बजावली आहे. दरम्यान, या प्रकरणात संबंधित दोषी आढळल्यास संचालकांचे पदही रद्द होऊ शकते. याप्रकरणी आता २१ डिसेंबर रोजी पुढील सुनावणी ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषिउत्पन्न खरेदी विक्री (विकास व नियमन) अधिनियम १९६३ च्या कलम ४५ नुसार ही नोटीस बजावण्यात आली आहे. प्रामुख्याने दोन मुद्दय़ावर आधारित ही नोटीस आहे. त्यामुळे सध्या हा विषय शेगावमध्ये चर्चेचा आहे. बाजार समितीमधील कामकाजाबाबत मोहन हुसे यांनी दोन डिसेंबर २0१४ ला पुणे येथील पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. यामध्ये काही बाबी पुराव्यासह त्यांनी मांडल्या होत्या. परिणामी गंभीर स्वरूपाच्या या तक्रारीची पणन संचालकांनी दखल घेत याप्रकरणी जिल्हा उपनिबंधकांना चौकशीसाठी नियुक्त केले होते. चौकशीअंती जिल्हा उपनिबंधकांनी ३ डिसेंबर रोजी बाजार समिती संचालकांना कलम ४५ नुसार नोटीस बजावल्या आहेत. पणन संचालकांच्या निर्देशानुसार करण्यात आलेल्या चौकशीत अनेक आक्षेपार्ह बाबी आढळून आल्या आहेत. बाजार समितीच्या आर्थिक हिताला बाधा पोहोचवल्याचा ठपकाही यात ठेवण्यात आला. बाजार समितीसाठी १९८१ मध्ये ५.११ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. या प्रकरणात १९८६ मध्ये अवार्ड देण्यात आला होता; मात्र त्यानंतर प्रकरणातील वादींनी वाढीव मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात नंतर तडजोड होऊन तीन हेक्टरच्या जवळ पास जमीन संबंधितांना बाजार समितीजवळ पैसा नसल्याने परत देण्यात आली होती. या प्रकरणात कुठलीही अचल संपत्ती ही पणन संचालकांनी कलम १२ नुसार मान्यता घेतल्याशिवाय परत देता येत नाही. अशा जमिनीचे व्हॅल्यूएशनही करण्याबाबत बाजार समितीने दिरंगाई केली होती. त्यानुषंगाने ही नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच अन्य काही बाबींचा उहापोहही करण्यात आला आहे. या प्रकरणात काही लोकांना लाभ पोहोचवण्याच्या उद्देशाने बाजार समितीच्या हितास बाधा पोहोचवली गेल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात २१ डिसेंबरला सुनावणी होणार आहे. त्यात संचालकांना त्यांचे म्हमणे मांडण्याची संधी देण्यात येणार आहे. आरोप सिद्ध झाल्यास प्रसंगी संचालकांचे सदस्यत्वही अनर्ह ठरू शकते. त्यामुळे या विषयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.