शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीन प्रक्रिया प्रशिक्षणाने महिलांना उद्योगाची नवी दिशा

By admin | Updated: July 4, 2017 19:30 IST

हिवराआश्रम : साखरखेर्डा मधील मौजे शिंदी व मौजे साखरखेर्डा येथील ४५ महिलांना सोयाबिन प्रक्रिया विषयाचे प्रशिक्षण कृषी महाविद्यालय हिवरा बु. येथे पार पडले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवराआश्रम : महिला आर्थिक विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय बुलडाणा, जन शिक्षण संस्थान बुलडाणा (श्रमिक विद्यापीठ) व विवेकानंद कृषी महाविद्यालय हिवरा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने मविम बुलडाणा अंतर्गत कार्यरत लोक संचालित साधन केंद्र, साखरखेर्डा मधील मौजे शिंदी व मौजे साखरखेर्डा येथील एकूण ४५ महिलांना सोयाबिन प्रक्रिया विषयाचे प्रशिक्षण कृषी महाविद्यालय हिवरा बु. येथे पार पडले. यामुळे महिलांसाठी रोजगाराची नवी संधी निर्माण झाली आहे.सदर प्रशिक्षण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे सहसचिव आत्मानंद थोरहाते होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जिल्हा परिषद सदस्य संजय वडतकर, विवेकानंद आश्रमाचे सचिव संतोष गोरे व विवेकानंद कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे आदी उपस्थित होते. यावेळी मोनिका खत्री यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. प्रशिक्षण कार्यक्रमाची रूपरेषा मविमचे जिल्हा उपजीविका विकास अधिकारी विशाल शालीग्राम पवार यांनी केली. त्यांनी मविम अंतर्गत जिल्हाभरात बचत गटातील महिलांचा उपजीविका विकास होण्याच्या दृष्टीने तसेच महिलांची आर्थिक वृद्धी होण्याच्या दृष्टीने घेतल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सोबतच जन शिक्षण संस्थानचे प्रतिनिधी अरुण देशमुख यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आश्रमाचे सचिव गोरे यांनी महिलांना स्वत:ची आर्थिक व सामाजिक वृद्धी करण्याबाबतचे मार्गदर्शन केले व सोबतच विवेकानंद आश्रमाबद्दल माहिती दिली. महिलांना आपल्याकडे सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या सोयाबिनवर प्रक्रिया करून त्यापासून सोया दुध, सोया पनीर व सोया कॉफी कशी बनवायची याबद्दल प्रात्यक्षिके करून माहिती दिली. महिलांनी सुद्धा खूप आवडीने सहभाग घेऊन सर्व बाबी स्वत: प्रत्यक्षिके करून समजून घेतल्या. सदर प्रशिक्षणाला गटांच्या महिलांसोबतच कृषी महाविद्यालयाच्या एकूण २० विद्यार्थीनींनी सुद्धा उस्फुर्त सहभाग घेतला होता.