शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:32 IST

बुलडाणा: येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुषंगने बुलडाणा जिल्ह्यातील दुर्धर आजार ...

बुलडाणा: येत्या १ एप्रिलपासून ४५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानुषंगने बुलडाणा जिल्ह्यातील दुर्धर आजार असणारे आणि ६० वर्षावरील व्यक्ती असे मिळून ४ लाख ४२ हजार नागरिकांना लसीकरण करावे लागणार आहे.

दरम्यान, सध्या बुलडाणा जिल्ह्यात ६० हजार डोस उपलब्ध असून आतापर्यंत फ्रंटलाईन वर्कस, आरोग्य कर्मचारी, यांच्यासह अन्य असे मिळून जवळपास ७५ हजार ५६१ जणांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. आतापर्यंत लसीकरणाचा मंद असलेला वेग आता वाढण्याची शक्यता असून दररोज सरासरी ५ हजार व्यक्तींना कोरोनाची लस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या ही अधिक असल्याचे जाणवत असून जवळपास ३ हजार नागरिकांना सध्या कोरोनाची दररोज लस दिल्या जात असल्याचे चित्र आहे.

बुलडाणा जिल्ह्यात ७२ शासकीय केंद्रांवर आणि १६ खासगी रुग्णालयातील केंद्रांवर अशा ८८ केंद्रांवर लसीकरण करण्यात येत असून येत्या काळात ही केंद्रांची संख्या दुपटीने वाढविण्याचे जिल्हा प्रशासनाचे नियोजन आहे.

--४.४२ लाख नागरिकांचे करावे लागणार लसीकरण--

बुलडाणा जिल्ह्याची लोकसंख्या २६ लाखांच्या आसपास आहे. यापैकी ३ लाख ८५ हजार ३४९ नागरिक हे ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहे तर ५६ हजार ८०० नागरिक हे सध्या दुर्धर आजाराने जिल्ह्यात ग्रस्त आहे. एकंदरी ४५ वर्षावरील व्यक्तींना १ एप्रिलपासून लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे उपरोक्त व्यक्तींना प्राधान्याने लसीकरण करावे लागणार आहे.

-- ६० हजार डोस उपलब्ध--

जिल्ह्यात सध्या ६० हजार डोस उपलब्ध आहे. तूर्तास लसीचा तुटवडा जिल्ह्यात नाही. मात्र आगमी काळात कोरोना लसीकरणाचा वाढता वेग पाहता आणखी डोसची गरज पडणार आहे. त्यादृष्टीने आरोग्य विभागाने लसीच्या डोसची मागणी केली असल्याची माहिती लसीकरण मोहिमेवर बारकाईने लक्ष ठेवून असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली. नेमकी किती डोसची मागणी केली आहे, हे सूत्रांनी सांगण्यास नकार दिला. दरम्यान, येत्या काळात लसीकरणाच्या दृष्टीने कॅम्पही घेतले जाण्याची शक्यता व्यक्त होत असून तशी प्रशासकीय वर्तृळात चर्चा होत आहे.

--या प्रमाणे झाले लसीकरण--

कर्मचाऱ्याचा प्रकार पहिला डोस दुसरा डोस एकूण

हेल्थ वर्कर्स १२८०५ ५१०८ १८,२६३

फ्रन्टलाइन वर्कर्स ०९५०८ २०४२ ११,५५०

४५-५९ वयोगट १०,६५७ ०००५ १०६६२

६० वर्षावरील ४२,५९१ ०००५ ४२,५९६