शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

अर्थकारणाला सावरण्यासाठी निर्णायक पावसाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST

बुलडाणा : कोरोना व गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने फटका दिलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण ...

बुलडाणा : कोरोना व गेल्या दोन वर्षांपासून परतीच्या पावसाने फटका दिलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे जवळपास २४ हजार कोटी रुपयांचे अर्थकारण सावरण्यासाठी आता निर्णायक पावसाची गरज असल्याचे चित्र आहे. जून महिन्याच्या अखेरीसही जिल्ह्यात ९० टक्के खरिपाच्या क्षेत्रावरील पेरण्या रखडलेल्या आहेत. त्यातच हवामान खात्याने गुरुवारी दिलेल्या विस्तारित अंदाजामध्ये जिल्ह्यात १८ ते २४ जूनदरम्यान सरासरीपेक्षा कमीच पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सोबतच २५ जून ते १ जुलैदरम्यानच्या अंदाजामध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याचे यामध्ये म्हटले आहे. त्यामुळे ९५ टक्के अर्थकारण कृषीवर अवलंबून असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळातील पावसावरच जिल्ह्याची मदार राहणार असल्याचे दिसते. गेल्या चार ते पाच वर्षांत कोरडा व नंतर ओला दुष्काळ जिल्ह्यात पडला होता. त्यानंतर कोरोनाचे संकट गेल्या १५ महिन्यांपासून घोंगावत आहे. सिंचन सुविधा कमी आणि कोरडवाहू क्षेत्र अधिक असलेल्या बुलडाणा जिल्ह्याची मदार त्यामुळे मान्सूनच्याच पावसावर अवलंबून असते. त्यातच जिल्ह्यातील बँकांकडून करण्यात येणाऱ्या एकूण पतपुरवठ्यापैकी ३४ टक्केच शेतकऱ्यांना पतपुरवठा होतो. अशा स्थितीत या महिनाअखेर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस न झाल्यास कृषी क्षेत्राला बसणाऱ्या फटक्याचे परिणाम हे अन्य क्षेत्रावरही पडू शकतात व त्यातून अर्थकारण आणखी डबघाईस येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

--पेरणीस विलंब, परतीच्या पावसाचा फटका--

समाधानकारक पाऊस न पडल्यास पेरणी उशिरा होऊन पिकांचे जीवनचक्रही उशिरा पूर्ण होईल. त्यातच अलीकडील काळातील हवामान बदलामुळे परतीच्या पावसाचा गेली दोन वर्षे कहर पहावयास मिळाला. त्याचाही फटका प्रसंगी या पिकांना नंतर बसू शकतो. त्यामुळेच पेरण्यांसाठी तथा अर्थकारण सावरण्यासाठी आगामी काळात पडणारा पाऊस हा निर्णायक ठरणार आहे. २०१९ मध्ये वार्षिक २२.१९ टक्के परतीचा पाऊस पडला होता. त्यामुळे खरिपातील पिकांचे नुकसान झाले होते. २०२० मध्येही अशीच स्थिती होती.

--चार तालुक्यांची स्थिती चांगली--

आतापर्यंत पडलेला पाऊस जूनच्या सरासरीच्या चार टक्के कमी असला तरी खामगाव, चिखली, मेहकर आणि सिंदखेड राजा तालुक्यातील एखाद दोन महसूल मंडळे वगळता चांगला झाला आहे. मेहकरची स्थिती उत्तम आहे. त्यामुळे या भागात पेरण्या होऊ शकतात; परंतु अन्य तालुक्यांत तशी स्थिती नाही. त्यामुळे अन्य तालुक्यात पाऊस कसा पडतो यावर बरेचशे गणित अवलंबून आहे.

--विस्तारित अंदाजात पाऊस कमी--

हवामान विभागाकडून दर गुरुवारी देण्यात येणाऱ्या विस्तारित अंदाजामध्ये १८ ते २४ जूनदरम्यान सरासरीपेक्षा कमी पाऊस सांगण्यात आला आहे. मात्र, २५ ते १ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा अधिक पाऊस सांगितलेला आहे. त्यामुळे पेरणीच्या दृष्टीने या कालावधीतील पाऊस हा निर्णायक ठरणारा राहू शकतो, असे जिल्हा कृषी हवामान विभागाचे तज्ज्ञ मनेष यदुलवार यांनी स्पष्ट केले.