शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘ज्ञानगंगा’ विस्ताराच्या हालचालींना वेग देण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 12:06 IST

The need to accelerate the ‘Gyanganga’ expansion movement : डिसेंबर २०१९ मध्ये टीपेश्वर अभयारण्यात टी१ सी१ हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  टायगर कॉरिडॉरला चालना मिळण्याच्या दृष्टीने वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूटच्या सूचनेनुसार ज्ञानगंगा अभयारण्याचे क्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या आधारावर ज्ञानगंगा अभयारण्याच्या विस्ताराच्या हालचालींना वेग देण्याची गरज आहे. यासंदर्भात चालू वर्षाच्या प्रारंभी वन्यजीव विभागांतर्गत प्रयत्न झाले होते.डिसेंबर २०१९ मध्ये टीपेश्वर अभयारण्यात टी१ सी१ हा वाघ ज्ञानगंगा अभयारण्यात आला होता. त्यामुळे ज्ञानगंगा अभयारण्य वाघांच्या अधिवासासाठी उपयुक्त आहे किंवा नाही, यासंदर्भात बारकाईने निरीक्षणे नोंदविण्यात आली होती. त्यामुळे टायगर कॉरिडॉरला चालना मिळण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ज्ञानगंगा अभयारण्यात प्रति चौरस कि.मी. १८.२३ तृणभक्षी प्राणी असल्याने वाघांसाठीचे खाद्य येथे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. परिणामी वाघांच्या अधिवासासाठी ज्ञानगंगा अभयारण्य उपयुक्त असल्याबाबत तज्ज्ञांचे एकमत झाले होते.  मात्र, २० वाघांच्या रहिवासासाठी ८०० ते १०० चौ. कि.मी. क्षेत्र आवश्यक असते. त्यामुळे भविष्यात या पट्ट्यात वाघांचे नैसर्गिकरीत्या स्थलांतर झाल्यास त्यासाठी एक कॉरिडॉर असावे या दृष्टिकोनातून ज्ञानगंगा अभयारण्याच्या विस्तारासंदर्भात हालचाली सुरू झाल्या होत्या. त्यानुषंगाने बुलडाणा, मोताळा आणि खामगाव तालुक्यातील प्रादेशिक वनविभागांतर्गत येणारा भाग ज्ञानगंगा अभयारण्यात समाविष्ट केला जावा, असा विचार समोर आला होता. त्याबाबत सर्वेक्षणही झाले होते, अशी माहिती आहे. मात्र, कोरोनामुळे बदललेली परिस्थिती वनविभागांतर्गत तापलेले वातावरण या मुद्यांमुळे हा विषय मागे पडला होता. त्यास आता पुन्हा एकदा गती देण्याची गरज व्यक्त होत आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाdnyanganga abhayaranyaज्ञानगंगा अभयारण्य