शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेंदला उपकेंद्रांतर्गत ‘नवे पर्व नवी दिशा’ अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 00:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ‘नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणातर्फे ११ ते २६ जुलैदरम्यान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील शेंदला उपकेंद्रांतर्गत हे अभियान ...

ठळक मुद्देकीर्तनातून दिला ‘बेटी बचाओ’चा संदेश

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : ‘नवे पर्व, नवी दिशा, नवे संकल्प’, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हे अभियान आरोग्य विभाग जिल्हा परिषद बुलडाणातर्फे ११ ते २६ जुलैदरम्यान राबविण्यात आले. त्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीणकुमार निकस यांच्या नेतृत्वामध्ये तालुक्यातील शेंदला उपकेंद्रांतर्गत हे अभियान पार पडले.या अभियानामध्ये ग्राम पातळीवर ‘बेटी पढाओ, बेटी बचाओ’साठी जनजागृती करण्यात आली. गावोगावी अनेकांच्या घरावर आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा स्वयंसेविका यांनी स्टिकर्स लावले. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चे फलक लावण्यात आले. तसेच उपकेंद्रांतर्गत असलेल्या शाळेमधून प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण निकस यांनी जनजागृती होण्यासाठी कीर्तनाचा कार्यक्रम, तसेच निबंध स्पर्धासुद्धा आयोजित केली होती. या अभियानासाठी आरोग्य कर्मचारी, उपकेंद्रांतर्गत गावामधील सरपंच, ग्रा.पं. सदस्य, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, सर्व मुख्याध्यापक व शिक्षक वृंद, कर्मचारी व नागरिकांचे सहकार्य लाभले.