शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेने जिल्ह्यात घेतला वेग!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 00:37 IST

बुलडाणा :  देशातील जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गांना  जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेने वेग घेतला असून,  बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १३२  किलोमीटर लांबीच्या  रस्त्यांसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया ही संयुक्त मोजणी स्तरावर  पोहोचली आहे.

ठळक मुद्देचिखली-धाड-भोकरदन मार्गाला केंद्राच्या मान्यतेची प्रतीक्षा!रस्ते विकास 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा :  देशातील जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गांना  जोडण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेने वेग घेतला असून,  बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास १३२  किलोमीटर लांबीच्या  रस्त्यांसाठी सध्या भूसंपादन प्रक्रिया ही संयुक्त मोजणी स्तरावर  पोहोचली आहे.या रस्त्यांची कामे वेगाने होण्यासाठी संयुक्त मोजणी ते निवड स् तरावर या भूसंपादन प्रकरणाचा आता अधिक वेगाने निपटारा  होणे गरजेचे आहे. ५४८ सीसी, ७५३ ई आणि ७५३ एम या  राष्ट्रीय महामार्गासाठी जवळपास ५१.७0 हेक्टर जमीन संपादीत  करणे आवश्यक असून, या प्रक्रियेमुळे एकूण एक हजार ३१६  भूधारक प्रभावित होत आहेत.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अकोलाच्या अखत्यारीत येत  असलेल्या मंठा-लोणार-चिखली-खामगाव या एनएच-५४८  सीसी मार्गासाठी मेहकर, सिंदखेड राजा, खामगाव आणि  बुलडाणा विभागात ३२.५२ हेक्टर जमीन संपादीत करावी  लागणार आहे. यामुळे जवळपास  एक हजार १४२ भूधारक  प्रभावित होत आहे. त्यासंदर्भातील सविस्तर अहवालही  पाठविण्यात आला असून, १९ ऑगस्टलाच तो देण्यात आला  आहे. या जागेच्या भूसंपादनाचीही प्रक्रिया सध्या संयुक्त मोजणी  स्तरावर पोहोचली आहे.दुसरीकडे अकोला विभागाच्याच अखत्यारित येत असलेल्या  अजिंठा-बुलडाणा-खामगाव (एनएच७५३ ई) या  मार्गासाठीचीही भूसंपादन प्रक्रिया सध्या प्रशासकीय पातळीवर  सुरू असून, त्याच्याही संयुक्त मोजणीचे प्रस्ताव पाठविण्यात  आले आहे. येथे अवघी १.५६ हेक्टर जमीन संपादीत करावी  लागणार असून, १५ शेतकरी त्यामुळे बाधित होत आहेत.  अजिंठा-बैतुल मार्गाचा हा भाग आहे.असे असले तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या औरंगाबाद  कार्यालयाच्या अखत्यारीत गेलेल्या चिखली-दुधा-धाड- भोकरदन या राष्ट्रीय महामार्ग एनएच ७५३ एमचा भाग  असलेल्या रस्त्यासाठी मात्र अद्याप केंद्र शासनाने परवानी दिली  नसल्याची माहिती समोर येत आहे. या रस्त्यासाठी १0.६१ हे क्टर जमीन संपादीत करावी लागणार असून, तसा प्रस्तावही  बुलडाणा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात  आला आहे; मात्र केंद्र शासनाच्या परवानगीशिवाय हा प्रश्न तू र्तास हाताळणे शक्य नसल्याचे चित्र आहे.

मुख्यमंत्र्यांचेही लक्षमुख्यमंत्र्यांच्या दृष्टीनेही रस्ते विभागाचा हा मुद्दा महत्त्वाचा  असून, विभाग स्तरावर घेण्यात येणारा आढावा बैठकीत प्रकर्षाने  त्यांनी रस्ते कामांची माहिती घेतली आहे. त्यानुषंगाने बुलडाणा  जिल्ह्यातील यंत्रणांनीही आपली माहिती अद्ययावत केलेली  आहे. राष्ट्रीय महामार्ग, शेतकरी आत्महत्या, जलयुक्त शिवार,  कौशल्य विकास आणि सिंचन प्रश्नांना आढावा बैठकांमध्ये  प्राधान्य दिले जात आहे. दरम्यान, इटीएस मशीनद्वारे काही  ठिकाणी जमिनीची मोजणी सुरू आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा