शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
4
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
5
बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
6
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
7
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
8
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
9
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
10
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
11
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
12
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
13
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
14
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
15
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
16
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
17
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
18
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
19
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
20
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

नराधम बापाने चिमुरड्याला गरम तव्यावर उभे केले

By admin | Updated: May 4, 2015 01:18 IST

पित्याविरुद्ध आईची बुलडाणा पोलिसात तक्रार

बुलडाणा : एका निर्दयी पित्याने स्वत:च्या एक वर्षीय मुलाला गरम तव्यावर उभे केले. यामुळे बालकाच्या पायाच्या तळव्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना पाच दिवसांपूर्वी औरंगाबाद येथील वाळुज एमआयडीसी परिक्षेत्रात घडली. या प्रकरणी मुलाच्या आईने ३ मे रोजी बुलडाणा पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीच्या आधारे या निर्दयी पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.बुलडाणा येथील रुपाली विष्णू खरात हिचा विवाह ३ वर्षांपूर्वी जालना जिल्ह्यातील बेलोरा येथील सुनील हिंमतराव भोसले यांच्याशी विवाह झाला. तो वाळुज एमआयडीसीमध्ये एका हॉटलमध्ये काम करीत होता. त्यामुळे लग्नानंतर सुनील भोसले पत्नी रुपाली सोबत औरंगाबाद येथील वाळुज येथे स्थायिक झाला; मात्र सुनीलला दारूचे व्यसन असल्यामुळे तो पत्नी रु पलीला नेहमीच मारहाण करीत होता.या दरम्यान २८ एप्रिल रोजी रुपाली आपल्या एक वर्षाचा मुलगा शिवराज याला पती सुनीलकडे ठेवून शौचास केली. यावेळी दारूच्या नशेत सुनीलने शिवराजला घरातील गरम तव्यावर उभे केले. वेदनेमुळे शिवराजचा जोरजोराने रडण्याचा आवाज ऐकून रुपाली घरी आली. ती घरी आल्याचे पाहून सुनीलने तेथून पळ काढला. या प्रकारानंतर रुपाली बुलडाणा येथे माहेरी आली. दरम्यान, ३ मे रोजी बुलडाणा पोलीस स्टेशनला तिने पती विरुद्ध तक्रार दिली. या आधारे पोलिसांनी सुनलि हिंमतराव भोसले याच्यावर गुन्हा दाखल केला. या संदर्भात अद्याप पोलिसांनी कारवाईला प्रारंभ केला नव्हता.