शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नांदुरा-ब-हाणपूर आता राष्ट्रीय महामार्ग!

By admin | Updated: February 4, 2016 01:38 IST

चौपदरीकरणाला मंजुरी; दोन राष्ट्रीय महामार्गांच्या नकाशावर जळगाव.

नानासाहेब कांडलकर/ जळगाव: मुंबई ते कोलकाता या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ला जोडणारा नांदुरा-जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या आंतरराज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला आहे. ८६ कि.मी. अंतराच्या या रस्त्याच्या चौपदीकरण कामाला मंजुरी मिळाली असून, नोव्हेंबरअखेर प्रत्यक्ष या कामास प्रारंभ होत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. संजय कुटे यांनी यास दुजोरा दिला असून, या रस्त्यामुळे दळणवळणाच्या दृष्टीने जळगाव जामोद शहर हे मोक्याच्या ठिकाणी येणार आहे. यापूर्वी नांदेड ते बर्‍हाणपूर या रस्त्यालासुद्धा राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. नांदेड, हिंगोली, वाशिम, पातूर, बाळापूर, शेगाव, वरवट , संग्रामपूर, जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर असा दोन प्रांतांना जोडणार्‍या या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने या रस्त्याचेसुद्धा चौपदीकरण अपेक्षित आहे. तसेच हैद्राबाद ते नांदेड हा रस्ता यापूर्वीच राष्ट्रीय महामार्ग आहे. आंध्र प्रदेश, महाराष्ट्र व मध्य प्रदेश अशा तीन प्रांतांना जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग जळगाव जामोद शहरातून जात असतानाच आता नांदुरा, जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या रस्त्यालाही राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाल्याने जळगाव जामोद हे शहर आता दोन राष्ट्रीय महामार्गांवर येणार आहे. नांदुरा, जळगाव जामोद ते बर्‍हाणपूर या रस्त्याच्या चौपदीकरणाचे भूमिपूजन मागील आठवड्यात जळगाव खान्देश येथे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडल्याचीही माहिती आ.डॉ. संजय कुटे यांनी दिली. या दोन्ही राष्ट्रीय महामार्गांमुळे जाणे आणि येणे अंतर सुमारे १५0 किलोमीटरने कमी होणार आहे. त्यामुळे हैद्राबादकडून इंदोरकडे जाणारी व नागपूर, अमरावतीवरून खंडवा व इंदूरकडे जाणारी सर्व वाहने भविष्यात याच रस्त्याने जाणार असल्याने जळगाव, संग्रामपूर व शेगाव या शहरांसह या तीन तालुक्यांनासुद्धा विशेष महत्त्व प्राप्त होऊन विकासाला व व्यापाराला मोठी गती मिळणार आहे.