बुलडाणा : राज्यात नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार दिला असला तरी जिल्ह्यात चोरीछुपे नायलॉन मांजाची खरेदी-विक्री होत असल्याचे धक्कादायक वास्तव लोकमत चमूने मंगळवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उजेडात आले. आरोग्यासाठी घातक असलेल्या या मांजावर न्यायालयाने घातलेली बंदी धाब्यावर बसवित विक्रेते संबंधित शासन यंत्रणेला हा ताशी धरुन आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणार्या नायलॉन मांजामुळे होणारे अपघात ही दरवर्षीची समस्या आहे. विशेषत्वाने पादचारी आणि दुचाकी वाहनधारक तसेच पक्षी नायलॉन मांजाचे बळी ठरत आहेत. पतंगासाठी नायलॉन मांजाची विक्री आणि खरेदी करण्यास बंदी घालण्यात आली असली तरी जिल्ह्यात नायलॉन मांजाची छुपी विक्री सुरू असल्याचे चित्र आहे. पतंगाचा मांजा मजबूत असावा, काटाकाटीच्या खेळात तो तुटू नये यासाठी शहरातील अनेक पतंगप्रेमी नायलॉन मांजाला जास्त पसंती देतात. या मांजास अधिक मागणी असल्याने विक्रेत्यांकडूनही नायलॉन मांजाची विक्री केली जात आहे. शहरात स्थायी स्वरूपाचे दुकान नाही; मात्र संक्रांतीच्या सणानिमित्त शहरातील जनता चौक, इकबाली चौक, कारंजा चौकात पतंग व मांजा विक्रीची दुकाने थाटली गेली असून नायलॉन मांजाला ग्राहकांची मोठी पसंती आहे. मात्र हा मांजा विकताना दुकानदार कमालीची गुप्तता पळाताना दिसतात. नायलॉन मांजा खरेदी-विक्री करताना ग्राहक व दुकानदार तंबूज या कोड वर्डचा वापर करतात. असा आहे न्यायालयाचा आदेशमुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी नायलॉन मांजावरील बंदी हटविण्यास तूर्तास नकार देऊन व्यापार्यांना ह्यवेट अँन्ड वॉचह्ण भूमिकेवर ठेवले. त्यासोबतच पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजाची विक्री व वापर सुरू ठेवायचा की, कायमची बंदी आणायची यावर शासनाला १९ जानेवारी पर्यंत ठोस निर्णय घेण्याचे निर्देश देऊन मुख्य सचिवांचे प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले. याप्रकरणी गेल्या १0 वर्षांपासून ठोस निर्णय घेतला नाही म्हणून न्यायालयाने राज्य शासनाची कानउघाडणी केली आहे.*मनुष्य व पक्ष्यांसाठी घातकनायलॉन मांजामुळे मनुष्य आणि पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याचे वारंवार पुढे येत आहे. हा मांजा तुटत नाही. त्यामुळे रस्त्याने ये-जा करणार्या लोकांच्या मानेत, पायात अडकून गंभीर दुखापत होण्याची शक्यता असते. नायलॉन मांजा एखाद्या झाडावर किंवा विद्युत वायरवर अडकल्यास त्याचा पक्ष्यांना कायमचा धोका असतो. *गुजरातमधून येतो मांजागुजरात राज्यातील अहमदाबाद शहरातून पतंग आणि नायलॉन व साधा-पारंपरिक मांजा बुलडाणा शहरातील बाजारपेठेत आला आहे. याशिवाय गोटा, स्टिल, गावठी, चकमक नाव असलेला मांजाही बाजारपेठेत उपलब्ध आहे. हा मांजा ५0 ग्रॅम, २५0 ग्रॅम, ५00 ग्रॅम अशा पद्धतीने ग्राहकांना विक्री केला जातो. दुकानदाराकडून पेपरमध्ये गुंडळून सुटा मांजा दिला जातो. *खामगावात येतो नागपूरचा मांजाखामगाव शहरातील पतंग विक्रीच्या दुकानावर नायलॉन मांजाची खुलेआमपणे विक्री सुरू असल्याची बाब मंगळवारी निदर्शनास आली. येथे विक्रीसाठी येणारा नायलॉन मांजा हा नागपूरमधून येत असून केवळ मकरसंक्रांतीपुरताच नव्हे तर वर्षभर नायलॉन मांजाची विक्री होते. पतंगाची खरी बाजारपेठ टिळक मैदान भागात असते. या ठिकाणी पतंगासोबतच विविध रंगातील नायलॉन मांजाची विक्री खुलेआमपणे होत आहे. शहरात नायलॉन मांजा हा नागपूर येथून विक्रीसाठी येत आहे. या मांजाचे दर १ हजार रुपये प्रतिकिलो असे आहेत. किलोच्या बंडलमधून ग्राहकांना मागणीप्रमाणे लागेल तेवढा मांजा रीलवर भरून देण्यात येतो. *बुलडाणा शहरात मांजा विक्रेत्यांची साखळी सक्रियपरराज्यातून नायलॉन मांजा बुलडाणा शहरापर्यंत पोहचविण्यासाठी साखळी सक्रिय आहे. नायलॉन मांजा प्लास्टिक रीळ वा बंडल स्वरूपात कागदी खोक्यातून रेल्वेद्वारे मलकापूर, नांदुरा व शेगावपर्यंत आणला जातो. बर्याच वेळा औरंगाबादमार्गे बसेसमधूनही नायलॉनचा मांजा शहरातील बाजारात येतो. पॉलिप्रॉपिलीनपासून तयार करण्यात आलेल्या मांजामुळे पतंग उडविणार्यांनाही धोका निर्माण होऊ शक तो. हा दोरा विजेच्या तारेला लागल्यास पतंग उडविणार्याला शॉक बसण्याचा धोका असतो.
बुलडाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाची छुपी विक्री
By admin | Updated: January 14, 2015 00:51 IST