शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

नाबार्डचा ४,६६५ कोटींचा पतआराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 14:16 IST

बुलडाणा : नाबार्डचा जिल्ह्याचा २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी चार हजार ६६५ कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांचा दिशादर्शक पतआराखडा जाहीर झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नाबार्डचा जिल्ह्याचा २०२०-२१ या वित्तीय वर्षासाठी चार हजार ६६५ कोटी १६ लाख ३४ हजार रुपयांचा दिशादर्शक पतआराखडा जाहीर झाला आहे. यात ७६ टक्के अर्थात तीन हजार ५५६ कोटी २१ लाख ७१ हजार रुपयांची तरतूद ही कृषी व संलग्न सेवांसाठी करण्यात आली आहे. तर उद्योग, व्यवसाय व शासकीय योजनांचा समावेश असलेल्या इतर कर्जासाठी २४ टक्के तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या दिशादर्शक पतआराखड्याच्या तुलनेत यंदा अडीच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे.नाबार्डच्या पुणे येथील क्षेत्रीय कार्यालय आणि तंत्र अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात हा जिल्ह्याचा दिशादर्शक पतआराखडा तयार करण्यात आला आहे. यावर्षी अधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत शेती हा मुद्दा यंदाच्या नाबार्डच्या दिशादर्शक पतआराखड्याच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आला आहे. दरम्यान, या दिशादर्शक पतआराखड्याच्या आधारावरच जिल्ह्याचा वार्षिक पतआराखडा तयार होत असतो. त्यादृष्टीने जाहीर झालेल्या दिशादर्शक पतआराखड्याचे महत्व अनन्यसाधारण आहे.पुढील वित्तीय वर्षासाठी शेती पीक कर्जासाठी दोन हजार ७३३ कोटी ७१ लाख ७९ हजार रुपये, शेती मुदती कर्ज आणि सलग्न सेवांसाठी ६७१ कोटी ९६ लाख ४४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. उद्योग व व्यावसायिक कर्जासाठी (लघु, मध्यम व सुक्ष्म) ३९६ कोटी ६३ लाख २५ हजार रुपये अशी तरतूद केलेली आहे. अपारंपाररिक ऊर्जा स्त्रोतांच्या विकासासाठीही जिल्ह्यात यंदा दोन कोटी ७२ लाख ४३ हजार रुपयांच्या कर्जाची तरतूद केली गेली आहे. अन्य प्राधान्य क्षेत्रासाठी एक हजार १०८ कोटी ९४ लाख ६३ हजार रुपयांची तरतूद केल्या गेली आहे. दुसरीकडे गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या दिशादर्शक पतआराखड्यात अडीच टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. गतवर्षीचा दिशादर्शक पतआराखडा हा चार हजार ५५० कोटी ५५ लाख ४२ हजार रुपयांचा होता. त्यात ही वाढ करण्यात आली आहे. शेती मुदती कर्जासाठीचे नियोजनआगामी वित्तीय वर्षासाठी सिंचन व मुलभूत सुविधांंकर्जासाठी ६७१ कोटी ९६ लाख ४४ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. दिशादर्शक पतआराखड्याशी तुलना करता त्याचे प्रमाण हे तब्बल १४.४० टक्के आहे. त्यामुळे यंदाच्या दिशादर्शक पतआराखड्यात गतवर्षीच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ करण्यात आली असल्याचे संकेत आहेत. यात प्रामुख्याने सिंचन सुविधांसाठी २८६ कोटी ४० लाख ८४ हजार, यांत्रिकीकरणासाठी २०० कोटी ९६ लाख ५५ हजार, फळबाग लागवडीसाठी ६८ कोटी २३ लाख, शेती सुधारणांसाठी तीन कोटी २१ लाख ५२ हजार या प्रमाणे तरतूद करण्यात आली आहे.

गृहनिर्माण क्षेत्रासाठी २९१ कोटीजिल्ह्यात गृहनिर्माण क्षेत्राची व्याप्ती वाढत आहे. त्यादृष्टीने या क्षेत्रासाठी यंदा २९१ कोटी १२ लाख ५० हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गतवर्षीच्या तुलनेत २२ कोटी १८ लाख ५० हजार रुपयांनी त्यात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे गतवर्षी गृहनिर्माण क्षेत्रात दिलेल्या कर्जाचा एनपीए हा अवघा एक टक्के होता. त्या पार्श्वभूमीवर यंदाच्या पीएलपीमध्ये ही वाढ झाली असून तशी मागणीही प्रत्यक्ष ग्राऊंड लेव्हलवर होत होती. शैक्षणिक कर्जासाठी ४२ कोटी ३७ लाख २० हजार रुपये, सौर ऊर्जेसाठी दोन कोटी ७२ लाख ४३ हजार तरतूद करण्यात आलेली आहे.

जिल्ह्याच्या आर्थिक दिशेला चालना नाबार्डअंतर्गत तज्ज्ञांनी बनविलेला हा आराखडा जिल्हा अग्रणी बँकेला २०२०-२१ या आर्थिक वर्षाचा पतआराखडा तयार करताना उपयुक्त ठरणार आहे. साधारणत: अग्रणी बँकेचा हा वार्षिक पतआराखडा हा मार्च अखेर किंवा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाशीत होत असतो. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात पीएलपीचा संदर्भ घेत वार्षिक पतआराखडा तयार करण्यास प्राधान्य देण्यात येते. मुळात नाबार्डअंतर्गत जवळपास ३० पेक्षा अधिक वर्षापासून प्रत्यक्ष जिल्ह्यातील वास्तविकतेच्या आधारावर असा संभाव्यता युक्त ऋण योजना अर्थात दिशादर्शक पतआराखाड तयार करण्यात येत यावर्षी अधुनिक तंत्रज्ञानयुक्त शेती हा (हाय टेक अ‍ॅग्रीकल्चर) मुद्दा घेऊन हा आराखडा तयार करण्यात आला आहे.पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढलाजिल्ह्यात २०१७-१८ मध्ये अवघे २६.१३ टक्केच पीक कर्ज वाटप झाले होते. त्या तुलनेत २०१८-१९ या वर्षात पीक कर्ज वाटपाचा टक्का वाढला असून तो ३२.५३ टक्के झाला आहे. ६१० कोटी ६३ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप झाले आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती