शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गर्भवती महिलांसाठी ‘माझं माहेर’

By admin | Updated: July 20, 2014 02:02 IST

आरोग्य विभाग : संग्रामपूर तालुक्यात वसाडी येथून प्रारंभ

संग्रामपूर : गर्भवती महिलांसाठी सकस आहार, नियमित उपचार व मार्गदर्शन याचा समावेश असलेल्या ह्यमाझं माहेरह्ण या नावीन्यपूर्ण उपक्रमाला १७ जुलै रोजी आदिवासी ग्राम वसाडी येथील अंगणवाडी केंद्रातून शुभारंभ करण्यात आला. यासाठी संग्रामपूरच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी शेवाळे यांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये १७ जुलैपासून प्रत्येक अंगणवाडीतील गरोदर स्त्रियांचे स्नेहशिबिर घेण्यात येतील. यामध्ये १,२९९ गरोदर स्त्रियांचा ताजा, सकस, आहार अंगणवाडीमध्ये दिला जातो. ज्यामध्ये लोकसहभागातून धान्य किंवा आर्थिक मदतीचा समावेश आहे. सोबतच गरोदरपणामध्ये महिलांनी कोणती काळजी घ्यावी, याबाबत सखोल मार्गदर्शन, एकमेकींशी मनमोकळ्या व आनंदी वातावरणामध्ये चर्चा, विरंगुळा व सहभोजनामुळे दोन घास जास्त खाल्ले जातात. हे माहेरीच शक्य असल्याने या उपक्रमाचे नाव माझं माहेर ठेवल्याची माहिती सर्मथ शेवाळे यांनी दिली. संग्रामपूर बालविकास प्रकल्प कार्यालयाअंतर्गत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेण्यात आले. यातील माझं माहेर या उपक्रमाला वसाडी येथून १७ जुलैपासून शुभारंभ करण्यात आला. यावेळी सभापती जिजाबाई प्रकाश धामोळे, जि.प. सदस्य नलिनीताई गावंडे, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी सर्मथ शेवाळे, पर्यवेक्षिका इंगळे, लठाड, सोनगिरे, आवारे, लिपिक खंडाळे, अंगणवाडी कर्मचारी कांता इंगळे, कोकिळा पालेकर व गरोदर माता हजर होत्या. सर्वाच्या सहकार्याने व मदतीने हा उपक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न करू व संग्रामपूर तालुक्याची वेगळी ओळख शासन स्तरावर निर्माण करण्याचा मानस शेवाळे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना व्यक्त केला. *दर गुरुवारी होते स्नेह शिबिरगरोदर स्त्रियांचे वजन व एचबीबाबतच्या मार्गदर्शनासाठी स्थानिक आशा एएनएम, अंगणवाडी सेविका यांचा सहभाग महत्त्वाचा राहणार आहे. महिन्यातील प्रत्येक तिसर्‍या गुरुवारी स्नेह शिबिर व जेवण, प्रत्येक गुरुवारी शेंगदाण्याचे लाडू, राजगुर्‍याचे लाडू लोकसहभागातून वितरित केले जाणार आहे. हा उपक्रम नावीन्यपूर्ण म्हणून हाती घेण्यात आला व याची सुरुवात आदिवासी गावापासून करण्यात आली.