शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आंदोलनाची धग कायम!

By admin | Updated: June 6, 2017 00:08 IST

शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र बंदला चांगला प्रतिसाद; ठिकठिकाणी ‘रास्ता रोको’

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात ५ जून रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. ५ जून रोजी जिल्ह्यात बंदला प्रतिसाद मिळाला. जिल्हाभर काँग्रेस, राष्ट्रवादीसह विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले, तर काही ठिकाणी रास्ता रोकोही करण्यात आला. सकाळच्या सुमारास विविध ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केल्यामुळे एसटी महामंडळाच्या बुलडाणा आगाराने बस बंद ठेवल्या होत्या. त्यानंतर दुपारच्या सुमारास बस सुरू करण्यात आल्या. देऊळगावराजा आणि देऊळगावमही येथील व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या आंदोलनात आपला सहभाग नोदविला, तसेच तालुका बंद ठेवण्यासाठी सर्व पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रतिष्ठाणे बंद ठेवण्यासाठी आवाहन केले होते. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या बंदला तालुक्यातील देऊळगावमहीसह परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसेना, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, आम आदमी पक्षासह राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात, अशी मागणी केली. शेतकरी दिवसेंदिवस अधिक आक्रमक होताना दिसत आहेत. या शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून, या संपात विविध बडे राजकीय पक्ष पाठिंबा देत उतरले आहे. त्यामुळे हे शेतकरी आंदोलन अधिक तीव्र होऊन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हाभर पोलीस बंदोबस्त होता. मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन देऊळगावमही येथे शेतकरी संपाला भाजपा सोडून सर्व पक्षीय नेते व कार्यकर्त्यांनी पाठिंबा दिला, तसेच येथील व्यापारी दुकाने बंद ठेवली. शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी मिळावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यामध्ये सर्व शेतकरी बांधवांनी भाग घेतला. येथील व्यापाऱ्यांनीही संपाला पाठिंबा दिला. सकाळी ८ ते ११ पर्यंत जालना चिखली रोडवर चक्का जाम करण्यात आला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. काँग्रेसने दिले निवेदन शेतकऱ्यांच्या संपाबाबत काँग्रसने निवासी उपजिल्हाकारी यांना निवेदन दिले. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, जि. प. सदस्य जयश्री शेळके, संतोष आंबेकर, समाधान हेलोडे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.