शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
2
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
3
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
4
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
5
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
6
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
7
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
8
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
9
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
10
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
11
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
12
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 
13
लेख: आषाढी पायी वारी :विज्ञाननिष्ठ उत्सव
14
मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 
15
मुलाला आईची जात लावण्यास मुंबई उच्च न्यायालयाने दिला नकार; प्रकरण काय? 
16
भारतीय संगीत पुढे आणण्याची गरज, आशा भोसले यांनी मांडले मत; देवेंद्र फडणवीसांनी गायले गाणे
17
फिजिओथेरपीच्या इंटर्न्सच्या वेतनात वाढ, बीएस्सी नर्सिंगच्या इंटर्सना मिळणार विद्यावेतन
18
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
19
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
20
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा

आई राधा, उदो-उदो

By admin | Updated: October 25, 2016 02:58 IST

खामगावातील जगदंबा माता उत्सवाची मुर्ती विसर्जनाने सांगता.

खामगाव, दि. २४- आई राधा उदो-उदो च्या गजरात भाविकांनी जगदंबा मातेला भावपूर्ण निरोप देत रात्री शहरानजीकच्या घाटपुरी येथील बोर्डी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले. गत १५ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेपासून शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जगदंबा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी या उत्सवाचा समारोप झाला. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजता मोठी देवीची आरती झाल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी मोठी देवी होती. त्यानंतर इतर मंडळांचा सहभाग होता. अकोला बाजार मार्गे गांधी चौक, महावीर चौक, जलालपुरा, भुसावळ चौक, सतीफैल, बर्डे प्लॉट, निर्मल टर्निंग, केडिया टर्निर्ंग, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, सावरकर चौक, पुरवार गल्ली, शिवाजी वेस, दंडेस्वामी मंदिर, घाटपुरी नाका या मार्गे मिरवणूक रात्री १0 वाजेपर्यंत घाटपुरी येथील बोर्डी नदी येथे पोहोचली. त्यानंतर मोठी देवीचे विसर्जन करण्यात आले, तर शहरातील काही मंडळांनी आपल्या सोयीने आपआपल्या भागातून मिरवणूक काढली. रात्री उशिरापर्यंत घाटपुरी येथील बोर्डी नदीपात्रात मातेच्या मूर्तीचे विसर्जन पार पडले. मिरवणुकीत हळद व कुंकवाची उधळण करण्यात आली. मातेसोबतच भाविकांनी हळदी-कुंकवाचा मरवट भरला होता. मोठी देवी मंडळासमोरील परडीवाल्यांचे पथक या मिरवणुकीतील आकर्षण ठरले.