शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

निविदा न बोलाविताच केला तीन लाखांपेक्षा जास्त खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 11:24 IST

Khamgaon News लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : कोरोना विषाणू संक्रमण कालावधी कृषी उत्पन्न बाजार समितीतील तत्कालीन संचालक मंडळ आणि प्रशासनाला भ्रष्टाचाराचे कुरण असल्याचेच सिद्ध होते. या कालावधीत शेतकऱ्यांच्या लक्षावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याने संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जोर धरत आहे.कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने भोजन पाकिटे, जीवनावश्यक वस्तू संच वाटपात लक्षावधी रुपयांची अनियमिता केल्याचे उघड झाले. त्यानंतर ३ लाखांपर्यंतचा खर्च निविदा न मागविताच केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. भ्रष्टाचारासाठी मर्यादेपेक्षा जास्त खर्च करण्यात आल्याने बाजार समितीचे सभापती, तत्कालीन संचालक मंडळ आणि संचालकांवर कोणती कारवाई केली जाते याकडे, लक्ष लागले आहे. बाजार समितीतील विविध अनियमिततेप्रकरणी द्विसदस्यीय चौकशी समितीने ६८० पानांचा अहवाल जिल्हा उपनिबंधक बुलडाणा यांच्याकडे सादर केला आहे. मात्र, या अहवालावर जिल्हा उपनिबंधकांकडून अद्यापपर्यंत कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे कुठे तरी पाणी मुरत असल्याच्या शंकेला वाव मिळत आहे.

सॅनिटाईज टनेल उभारणीवर उधळपट्टी! कृषी उत्पन्न बाजार समितीत सॅनिटाईज टनेल उभारणीवर तीन लक्ष ९४ हजार  रुपयांची उधळपट्टी करण्यात आली. याबाबत  चौकशी समितीने आक्षेप नोंदविला आहे.  निविदा मागवितानाच्या अटीनुसार टनेल सहा महिन्यांत बंद पडल्यास दुरुस्त करून द्यावे लागेल, त्यासंबंधातील कोणताही खर्च अदा केला जाणार नसल्याचे म्हटले आहे. मात्र, चौकशी समितीच्या प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी टनेल बंद होते. त्याचप्रमाणे बंद टनेल दुरुस्तीच्या दिशेने कोरोना काळात कोणतेही प्रयत्न बाजार समितीने केले नसल्याचा आक्षेपही चौकशी समितीने नोंदविला आहे. 

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा