शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

पंधरा वर्षांंपेक्षा जास्त जुनी वाहने रस्त्यावर

By admin | Updated: October 30, 2015 02:05 IST

वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह; परवाना नूतनीकरणात निरुत्साह!

बुलडाणा : रस्त्यावर धावणारे खासगी प्रवासी वाहन सुरक्षित आहे का? हे पाहण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनांची फिटनेस चाचणी घेण्यात येते.; मात्र २00१ पासून नवीन टॅक्सी परवाना देणे बंद केल्यानंतर फिटनेस चाचणी प्रक्रियेत खंड पडला. शिवाय नवीन वाहनं रस्त्यावर आले नाहीत. त्यामुळे १५ ते २0 वर्षे जुनी खासगी प्रवासी वाहने आजही जिल्ह्यातील रस्त्यांवर धावत आहेत. परिणामी, वाहनांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शहर व जिल्ह्यात खासगी प्रवासी व माल वाहतूक करणारी ४८ हजार १४९ एवढी वाहने आहेत. दैनंदिन उपयोगात आणल्या जाणार्‍या अशा वाहनांचा घसाराही अधिक होत असतो; परंतु त्याकडे वाहनमालक आणि चालकांकडून दुर्लक्ष होत असते. अशाच परिस्थितीत ती वाहने रस्त्यावर दामटविली जातात. त्यातून अपघाताचा धोकाही बळावतो, अशी वाहने वाहतुकीसाठी घातक ठरण्याची शक्यता अधिक असते; मात्र तरीही अशा वाहनांकडे दुर्लक्ष केल्या जाते. दरवर्षी अशा वाहनांचा फिटनेस उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून तपासला जातो. यात वायूप्रदूषण चाचणी, हेडलाईट चाचणी, व्हील अलायनमेंट चाचणी, ब्रेक चाचणी, चेचीस व बॉडी नंबर चाचणी या कामासाठी आरटीओकडे केली जाते. वाहनचालकांना वायुप्रदूषण केंद्राकडून वायुप्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र सादर करावे लागते. या निकषावर न उतरणारे वाहन कायमस्वरूपी अनफिट ठरविले जाते. राज्य शासनाने २00१ मध्ये आदेश काढून मुंबईसह राज्यातील इतर जिल्ह्यात टॅक्सी (कालीपिली) साठी परवाना देण्याचे बंद केले. यावेळी जिल्ह्यात १७६३ टॅक्सी परमिट असलेले वाहन रस्त्यावर धावत होते. यानंतर कुठलिही नवीन टॅक्सी परमिट वाहने जिल्ह्यातील रस्त्यावर आली नाहीत; मात्र पंधरा वर्षे जुनी वाहने आजही रस्त्यावर धावताना दिसतात. यामुळे जिल्ह्यात अपघाताचे प्रमाणही वाढत असल्यामुळे वाहनाच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.