मोताळा : घरासमोरील खाटेवर झोपलेल्या महिलेचा वाईट उद्येशाने हात धरूनओढल्याची घटना ६ एप्रिल रोजी शिरवा येथे घडली. या प्रकरणी बोराखेडीपोलिसांनी शिरवा येथील दिनकर धोंडू माहोरे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखलकेला आहे. पोलिस सूत्रांनुसार पीडितेने फिर्यादीमध्ये नमूद केले आहे की, ६एप्रिल रोजी स्वत:च्या घरासमोर खाटेवर झोपली असता, गावातील दिनकर धोंडूमाहोर वय ६५ हा तेथे आला व झोपलेल्या महिलेचा वाईट उद्येशाने हात धरूनघरात ओढत नेल्याचा प्रयत्न केला. मात्र पिडितेने आरडाओरड करून आरोपीच्यातावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली. या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनीआरोपी दिनकर धोंडू माहोरे यांच्याविरूद्ध कलम ३५४, ४५२ भादंविनुसारगुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोहेकां राजेश वानखेडे करीत आहे.(तालुका प्रतिनिधी)
मोताळा येथे विवाहितेचा विनयभंग
By admin | Updated: April 6, 2017 13:29 IST