मलकापूर : भुमीअभिलेख कार्यालयातील अधिकारी हजर राहत नसल्याकारणाने शेतकर्यांची, नागरीकांची कामे खोळंबली. त्यामुळे आज मनसेचेच्या स्थानिक शाखेच्यावतीन भूमिअभिलेख कार्यालयात शेतकर्यांसह उपोषणास सुरुवात केली.मलकापूर भूमीअभिलेख कार्यालयात अधिकारी तर हजरच रहात नाही. याबाबतची माहिती मनसे पदाधिकार्यांना मिळताबरोबर आज लोकशाही मार्गाने या कार्यालयात आमरण उपोषणास सुरुवात केली. उपोषणाची माहिती भ्रमणध्वनीव्दारा गजानन ठोसर यांनी बुलडाणा येथील मुख्य कार्यालयाला दिली व या कार्यालयाला प्रभारी अधिकार्यांऐवजी कामयस्वरुपी अधिकारी दया तसेच शेतकर्यांची प्रलंबित कामे पूर्ण करा मगच आम्ही उपोषण सोडवू अशी कठोर भूमिका मांडताच बुलडाणा येथील अधिकारी जोशी यांनी तात्काळ दुपारी १ वाजता मोताळा येथील एम.डी.भावे (प्रभारी मलकापूर) यांना पाठवून उपोषणकर्त्या शेतकर्यांची कामे तात्काळ मार्गी लावण्याचे सांगितले.
मनसेचे भूमीअभिलेख कार्यालयातच उपोषण
By admin | Updated: June 5, 2014 22:50 IST