शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

गुणवंत खेळाडूंना मिळणार शासनाकडून पेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:33 IST

बुलडाणा : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे ०७ जून २०१८ रोजीच्या निर्णयानुसार गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी ...

बुलडाणा : भारत सरकार युवा आणि क्रीडा मंत्रालय यांचे ०७ जून २०१८ रोजीच्या निर्णयानुसार गुणवंत खेळाडूंकरिता क्रीडा पेन्शनसाठी सुरक्षा पूर्ववत करणे, सक्रिय क्रीडा करिअरमधून अतिरिक्त आर्थिक सेवानिवृत्ती प्रदान करणे, ही एक महत्त्वाची योजना आहे. त्यानुसार गुणवंत खेळाडूंना पेन्शन मिळणार आहे.

ऑलिम्पिक, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स आणि ऑलिम्पिक गेम्समध्ये विश्वचषक स्पर्धेतील विशिष्ट उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना प्रामुख्याने मदत करणे हा या योजनेचा हेतू आहे. या योजनेच्या निकषानुसार अर्जदार खेळाडू हा भारताचा रहिवासी असावा व त्याने ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक गेम्स, कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स व वर्ल्ड कप (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धेत समाविष्ट खेळप्रकार) या स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कास्य पदक प्राप्त केलेले असावे. या स्पर्धेतील प्राविण्यप्राप्त, गुणवंत खेळाडूस मासिक मानधन देण्याची तरतूद केली आहे. तसेच पेन्शन ३० वर्षांपासून (किंवा सक्रिय क्रीडापासून सेवानिवृत्तीची तारीख, जे नंतर असेल) मिळणाऱ्या खेळाडूवर देय असेल आणि खेळाडूच्या आयुष्यादरम्यान कायम राहील. परंतु अशी पेन्शन लागू करताना खेळाडू सक्रिय क्रीडा करिअरमधून निवृत्त झाले असतील. दर चार वर्षांनी आयोजित होणाऱ्या विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धांकरिता ही योजना लागू राहील. याबाबत संबंधित पात्र खेळाडूंनी आवश्यक त्या कागदपत्रांसह प्रस्ताव केंद्र शासनास सादर करावयाचा असून, विहीत नमुन्यातील अर्जांवर संबंधित खेळाच्या राष्ट्रीय खेळ संघटनेचे अध्यक्ष/सचिव यांची स्वाक्षरी किंवा उपसचिव/आयुक्त, क्रीडा व युवक सेवा यांच्या स्वाक्षरीसह प्रस्ताव सादर करावयाचा आहे. राज्यातील जास्तीत-जास्त खेळाडूंनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे क्रीडा विभागाचे आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.

अशी राहणार दरमहा पेन्शन

ऑलिम्पिक / पॅरा ऑलिम्पिक गेम्स प्राविण्यधारक - दरमहा २० हजार रुपये, सुवर्ण पदक विश्वचषक / विश्व अजिंक्यपद स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) १६ हजार रुपये, रौप्य व कास्य पदक विश्वचषक स्पर्धा (ऑलिम्पिक व एशियन गेम्स स्पर्धात समाविष्ट असलेले खेळ प्रकार) - १४ हजार रुपये, सुवर्ण पदक-कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स १४ हजार रुपये, रौप्य व कास्य पदक-कॉमनवेल्थ गेम्स, एशियन गेम्स, पॅरा एशियन गेम्स १२ हजार रुपये मिळणार आहेत.