शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी अपात्र

By admin | Updated: June 2, 2017 03:02 IST

बहुचर्चित राजीव गांधी कॉम्प्लेक्स प्रकरण भोवले!

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : बहुचर्चित राजीव गांधी कॉम्प्लेक्स बांधकाम प्रकरणात नगराध्यक्ष कासम पिरु गवळी यांना गुरुवारी मुंबई येथे नगरविकास मंत्रालयाकडून अपात्र ठरविण्यात आले असून, या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेने फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे. मेहकर नगरपालिकेने विकास आराखड्यातील आरक्षण क्र.१२ विकसित करण्यासाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतरण करा’ तत्त्वावर भाजी मार्केट व शॉपिंग सेंटर बांधकाम करण्यासाठी २८ सप्टेंबर २०१२ ला ठराव पारित केला. हा प्रस्ताव प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे व नंतर ८ फेब्रुवारी २०१३ ला नगरविकास विभागाकडे सादर झाला. शासनाने २२ आॅगस्ट २०१४ ला प्रस्ताव अमान्य केला. शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच अशा विकास कामांचे कार्यादेश देण्यात यावेत, असे निर्देश आहेत; मात्र पालिकेने यश बांधकाम कंपनी यांची निविदा मंजूर करून २२ एप्रिल २०१३ ला कामाचे कार्यादेश दिले. तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून कासम गवळी यांनी सदर कार्यादेश देणे ही नियमांची उल्लंघन करणारी बाब असल्याचा ठपका ठेवत, जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कासम गवळी यांना पदावरून दूर करण्याची शासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्यमंत्री, नगरविकास विभाग यांच्यासमोर ३ मे २०१७ ला सुनावणी आयोजित करण्यात आली होती. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मेहकरचे तत्कालीन व विद्यमान नगराध्यक्ष कासम गवळी यांना महाराष्ट्र न.प., नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ अ व ब मधील तरतुदीनुसार अपात्र ठरविण्याचा आदेश गुरुवारी मुंबई येथे दिला. तसेच सहा वर्षांच्या कालावधीसाठी न.प.सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यासही निरर्ह ठरविण्यात येत असल्याचा आदेश दिला. या आदेशामुळे शहरात खळबळ उडाली असून, शिवसेनेने न.पा. व चौकाचौकांत फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले. न.पा. निवडणुकीतील विजयानंतर पदभार समारंभ कार्यक्रमात शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकरवासीयांना तीन महिन्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे सूचक विधान केले होते. त्याचीच आज शहरात चर्चा होती.