शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

मेहकर पालिका निवडणुक; मोर्चे बांधणीला सुरुवात

By admin | Updated: July 9, 2016 00:18 IST

डिसेंबरमध्ये मेहकर पालिका निवडणूक; सत्ताधारी विरोधाकमध्ये आरोपप्रत्यारोप.

सिद्धार्थ आराख / मेहकर(जि. बुलडाणा)येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणूकीमध्ये इच्छुकांनी मोचेर्बांधणी सुरू केली असून ऐनवेळी या निवडणूकीत अनेकांना झटका बसण्याची शक्यता आहे. सध्या केंद्रात आणि राज्यात भाजप आणि मित्र पक्षांचे सरकार सत्तेत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना हे चारही प्रमुख पक्ष ही निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याची तयारीत आहेत, त्यामुळे ये ती निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता आहे. मेहकर शहराची नुकतीच नव्याने प्रभाग रचना करण्यात आली असून २४ वार्डाचे १२ प्रभाग करण्यात आले आहेत. या वार्डाचे आरक्ष सोडत होऊन आणि प्रभागाची सिमा निश्‍चित झाल्यानंतर त्या - त्या प्रभागातील नगरसेवकांमध्ये चांगलाच गोंधळ उडाला. अनेक प्रस्थापित नकरसेवकांचे वार्ड तुटून दुसर्‍या वार्डात गेल्याने त्यांची पंचायत झाली. तर काहींना आयतेच गठ्ठा मतांचा तुकडा मिळाल्याने त्यांना मात्र ही प्रभाग रचना अनुकूल असल्याने ह्यकही खुशी, कही गमह्ण अशी आवस्था नगरसेवकांमध्ये झाली आहे. मात्र ज्यांना नविन वार्डरचना गैरसोयीची झाली आहे अशा अनेक आजी माजी विरोधी नगरसेवकांनी या वार्ड रचनेवर आक्षेप घेत सत्ताधारी नेत्यांच्या सांगण्यावरून वार्ड रचना झाल्याचा आरोप केला आहे. वास्तविक या आरोपात तथ्य नसल्याचे सत्ताधार्‍यांचे म्हणने आहे. पालिकेच्या निवडणूका जवळ आल्या, त्यामुळे आरोप प्रत्यारोपाच्या अशा फैरी होणार आहेत. निवडणूकांना सामोरे जायाचे म्हणजे सत्ताधार्‍यांचे वाभाडे काढल्याशिवाय विरोधकांना जनतेसमोर जाता येत नाही. सध्या काँग्रेसकडे बहुमत असल्यामुळे पालिकेवर काँग्रेसची सत्ता आहे. मागील साडेचार वर्षात काँग्रेसने नगर पालिकेत मनाप्रमाणे सत्ता राबविली. अर्थात विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेच्या संमत्तीनेच काँग्रेसला हे सारे करता आले. हे नागरीकांना चांगलेच माहित आहे. मागील साडेचार वर्ष काँग्रेसच्या विरोधात ब्र शब्दही न काढणार्‍या शिवसेनेने मागील आठवड्यात रस्त्याच्या एका कामावरून काँग्रेसला विरोध केला. काँग्रेसने सुध्दा लगेच नमते घे तले. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. हे नागरीकांना वेगळे सांगण्याची गरज नाही.