शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
3
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
4
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
5
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
6
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
7
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
8
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
9
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
10
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
11
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
12
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
13
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
14
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
15
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
16
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
17
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
18
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
19
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
20
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video

तंटामुक्तीची सभा पोलिस बंदोबस्तात

By admin | Updated: August 21, 2014 00:14 IST

ग्रामपंचायतीची ग्रामसभा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इतिहासीक ग्रामसभा ठरली

सिंदखेडराजा : तालुक्यात सर्वात मोठय़ा साखरखेर्डा ग्रामपंचायतीची ग्रामसभा महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदासाठी इतिहासीक ग्रामसभा ठरली असून, किमान दोन हजाराहून अधिक लोकांची उपस्थिती होती. प्रथम तणावपूर्ण वातावरणात होणारी निवडणूक राजकीय नेत्यांच्या मध्यस्तीने एकतर्फी झाली. १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घेऊन प्रत्येक गावात तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची निवड करण्यात यावी, असा आदेश शासनाचा होता. त्यानुसार साखरखेर्डा ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ९ वाजताची वेळ देण्यात आली होती. त्यासाठी जमनाप्रसाद तिवारी, मदनसेठ जैस्वाल, राजेंद्र ठोके, दिलीप बेंडमाळी, दिलीप इंगळे, रमेश गवई, नितीन फकिरा कंकाळ यासह दोन महिलांनी अर्ज दाखल केले होते. कोरम अभावी १५ ऑगस्टची ग्रामसभा १९ ऑगस्टला घेण्यात आली. जि.प.सदस्या सौ.स्नेहल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली एस.ई.एस. हायस्कूलच्या विस्तीर्ण परिसरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अगोदर राजकीय नेत्यांच्या मध्यस्तीने दिलीप इंगळे, रमेश गवई, मदनसेठ जैस्वाल, दिलीप बेंडमाळी, राजेंद्र ठोके यांचेसह दोन महिलांचे अर्ज मागे घेण्यात आले. अध्यक्ष पदासाठी जमनाप्रसाद तिवारी आणि नितीन फकिरा कंकाळ हे दोनच अर्ज राहिले. त्यात ग्रामसभेत जमनाप्रसाद तिवारी यांना एकतर्फी लोकांनी पसंती दिल्याने त्यांची निवड करण्यात आली. यावेळी दिलीप इंगळे यांनी तिवारी यांच्या नावाची जाहिर घोषणा केली तर अर्जून गवई यांनी अनुमोदन दिले.ग्रामसभेला शिवसेना नेते रविंद्र पाटील, सरपंच सुधाकर गवई, माजी सरपंच कमलाकर गवई, चंद्रशेखर शुक्ल, उपसरपंच रामदाससिंग राजपूत, ग्रा.पं.सदस्य जिवनसिंग राजपूत, माजी उपसभापती सुनिल जगताप, गणेशसिंग राजपूत, माजी जि.प.सदस्य एम.के.गवई, संतोष जैस्वाल, संजय जैस्वाल, युसूफसेठ कुरेशी, सदस्य रफीक सह सर्व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सचिव मनोज मोरे यांनी काम पाहिले. यावेळी पोलिस बंदोबस्त होता.