शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
2
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
3
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
4
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
5
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
6
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
7
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
8
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
9
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
10
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
11
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
12
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
13
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
14
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
15
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
16
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
17
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
18
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
19
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
20
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी

भूसंपादन वेगाने करा!

By admin | Updated: December 23, 2015 02:23 IST

खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढविण्याबाबत अहवाल तपासण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.

बुलडाणा : महत्त्वाकांक्षी जिगाव प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्‍या टप्प्यातील भूसंपादन, पुनर्वसनाचे काम त्वरित पूर्ण करावे, त्यासाठी भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांची रिक्त पदे त्वरित भरण्यात येतील. कनिष्ठ अभियंत्यांच्या रिक्त जागांवर परीक्षा न घेता गुणांच्या आधारे नियुक्त्या देण्यात याव्यात. ज्यामुळे रिक्त पदे त्वरित भरण्यात येवून प्रकल्प पुर्णत्वास न्यावेत, तसेच खडकपूर्णा प्रकल्पाची उंची वाढविण्यासंदर्भात मागील दहा वर्षाचे पाणीसाठ्याचे रेकॉर्ड तपासावे, तसेच पाणीसाठा वाढल्यामुळे होणार्‍या परिणामांचा अभ्यास करावा, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. विधानभवनच्या बैठक सभागृहात बुलडाणा जिल्हा आढावा बैठक मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी आढावा घेताना मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीला पालकमंत्री एकनाथराव खडसे, सहकार व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार सर्वश्री पांडुरंग फुंडकर, हर्षवर्धन सपकाळ, आकाश फुंडकर, राहुल बोंद्रे, डॉ. संजय कुटे, संजय रायमुलकर, शशीकांत खेडेकर, मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय, अपर मुख्य सचिव आनंद कुळकर्णी, पुरवठा विभागाचे सचिव दीपक कपूर, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव जैन, वन विभागाचे सचिव विकास खारगे, जलसंपदा विभागाचे सचिव सतीश गवई, जलसंधारण विभागाचे सचिव प्रभाकर देशमुख, पाणीपुरवठा विभागाचे सचिव राजेश कुमार, विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजूरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती दीपा मुधोळ आदी उपस्थित होते. जिगाव प्रकल्पाचा आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, की जिल्ह्यातील सिंचनाच्या प्रमाणात वाढ होण्यासाठी अपूर्णावस्थेत व निर्माणाधीन सिंचन प्रकल्पांमध्ये भूसंपादनाची कामे वेगाने पूर्ण करावी, असे निर्देश दिले.