शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंदीनंतरही मॅगीची विक्री जोमात!

By admin | Updated: June 17, 2015 01:35 IST

खामगाव शहरात छुप्या पद्धतीने मॅगीची विक्री.

खामगाव (जि. बुलडाणा) : टेस्ट भी, हेल्थ भी अशी भावनिक साद घालत लहान- मोठय़ांच्या मनावर अधिराज्य गाजविणार्‍या मॅगीच्या विक्रीवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. मात्र, शहरात छुप्या पद्धतीने मॅगीची विक्री होत असल्याचे वास्तव आहे. शरिरासाठी घातक घटक द्रव्य निघाल्यामुळे झटपट नास्ता म्हणून ओळख असलेल्या मॅगीवर देशभर बंदी घालण्यात आली. दिल्ली, हरयाणा, पंजाब या राज्यातून हद्दपार झालेल्या मॅगीला महाराष्ट्रातूनही बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. राज्य शासनाकडून एकाचवेळी बंदी घालण्यात आल्याने, मॅगी निर्मात्या कंपनीने देशात मॅगीची विक्री थांबविली. मात्र, असे असतानाही खामगाव शहरातील विविध दुकांनांवरून मॅगीची विक्री जोरात सुरू असल्याचे लोकमतच्या ह्यस्टींग ऑपरेशनह्ण मध्ये दिसून आले. बंदी घातल्यानंतरही साठा करण्यात आलेल्या मॅगीला छुप्या पद्धतीने विकले जात आहे. दरम्यान, दुकान अथवा सुपर शॉपीच्या दर्शनी भागावर स्थान असलेली मॅगी आता दुकानातील, शॉपीमधील अडगळीच्या कोपर्‍यात गेली आहे. किरकोळ दुकानांमध्ये इतर उत्पादनाच्या पुड्याखाली मॅगी ठेवली जात आहे. ग्राहकांने मागणी करताच चोरून-लपून मॅगीच्या पॅकेटची विक्री होत असल्याचे लोकमतच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसून आले. यासंदर्भात अन्न व प्रशासनाचे सहा. आयुक्त भाऊराव चव्हाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संपूर्ण राज्यात मॅगी विक्रीवर बंदी आहे. संबधीत कंपनीने आपला साठा परत बोलाविला आहे. मात्र, तरीही विक्री होत असेल तर त्यांच्यावर निश्‍चितच कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.

*खात्री नंतरच मॅगीची विक्री!

 शहरातील विविध भागातील दुकानांमध्ये मॅगीची मागणी केल्यास सुरूवातीला दुकानदार चक्रावतो. खरोखर ग्राहक असल्याची खात्री पटल्यानंतरच अनेक विक्रेते मॅगीचा पुरवठा करतात. मात्र, नियमित ग्राहकाला कुठलेही आढवेढे न घेता, मॅगी उपलब्ध करून दिली जात असल्याचे चित्र आहे.

*असे राबविण्यात आले स्टिंग ऑपरेशन

  शहरातील मुख्य बाजारपेठेसह किरकोळ परिसरातील दुकानांमध्ये जावून मॅगीची मागणी करण्यात आली. यावेळी गांधी चौकातील एका दुकानदाराने मॅगी नसल्याचे सांगत स्पष्ट नकार दिला. मात्र, मुख्य रस्त्यावरील एका डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये सुरूवातीला मॅगी नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, लहान मुलाला हवी आहे, मुलगा सारखा रडत आहे, असे सांगताच, त्या दुकानदाराने नोकराला बोलावून एका खोक्यातून मॅगी बोलावून दिली. शहरातील सिव्हीललाईन, जलंब रोडवरील चिखली रोड, घाटपुरी रोड भागातील मुख्य रस्त्यासह गल्ली बोळीतील दुकानांवर मॅगीची मागणी केली असता बहुतांश दुकानांमध्ये मॅगीची विक्री होत असल्याचे दिसून आले. शंकर नगर भागातील एका दुकानदाराने चक्क दुकानांच्या दर्शनी भागावर मॅगीची पाकिटे आढळून आली.