शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्स कंपन्याकडून प्रवाशांची लूट

By admin | Updated: October 25, 2014 23:54 IST

ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानी, भाडेवाढ दुप्पट.

बुलडाणा : दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, नाशिक येथे जाणार्‍या व तेथून परत येणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानी करीत तब्बल दुप्पट भाडेवाढ केली आहे. दरवर्षी या ट्रॅव्हल्स मालकांच्या दिवाळीत मात्र प्रवाशांचे दिवाळे निघत असताना उपप्रादेशिक परिवहन विभाग मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. सध्या दिवाळीचा माहोल आहे, प्रवाशांची गर्दी वाढली आहे. या गर्दीचा फायदा घेत प्रवाशांची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक पिळवणूक सुरू आहे. बुलडाणा-पुणे या मार्गावर स्लिपर कोचमधील प्रवासासाठी एक हजार ते १२00 रुपये प्रती सिट भाडे आकारले जात आहे. तर सिटिंगसाठी ७५0 ते ८00 रुपये आकारले जात आहेत. बुलडाणा-मुंबई या मार्गावर सध्या एसी स्लिपरसाठी १२00 रुपये भाडे आकारण्यात येत आहे. तर नियमित सिझनमध्ये हे भाडे ४५0 ते ५00 रुपये एवढे आकारल्या जाते. परिवहन विभागाचे नियम धाब्यावर बसवून ट्रॅव्हल्स मालक आपली मनमानी करतात. याकडे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे साफ दुर्लक्ष होत आहे. लक्झरी मालक प्रवाशाला कशी सेवा पुरवितो आणि प्रवासी वाहतुकीतील अंतर्गत स्पर्धा या सार्‍यावर भाडे दरात वाढ किंवा घट ठरलेली असते. दिवाळीनिमित्त मुंबई, पुणे, नाशिक येथे जाणार्‍या व तेथून परत येणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेता ट्रॅव्हल्स मालकांनी मनमानी करीत दुप्पट भाडेवाढ केली आहे. ट्रॅव्हल्स मालकांच्या दिवाळीत मात्र प्रवाशांचे दिवाळे निघाले आहे. पुणे व मुंबई या दोन मार्गावरील दिवाळीच्या काळातील गर्दी पाहता शहरातील सर्वच ट्रॅव्हल्स मालकांनी सध्या दुप्पट भाव केले आहेत