सिंदखेडराजा : साखरखेर्डा विज वितरण कंपनीच्या ३३ के.व्ही. उपकेंद्राने काही ग्राहकांना चक्क लाखाचे बिल देवून प्रचंड लूट सुरु केली असून ग्राहकांनी बिल भरायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.साखरखेर्डा वार्ड क्र.१ मधील मठाजवळ १00 चे रोहित्र आहे. २ जून रोजी वादळी वार्यामुळे अनेक वृक्ष उन्मळून पडली. पोलची तारे तुटली, विज वितरण कंपनीच्या ३३ के.व्ही. उपकेंद्रातून गावात जाणार्या मेन लाईनची तार दुसर्या तारेवर पडल्याने प्रचंड ज्वाला त्यातून निघाल्या. विज दाब वाढल्याने वार्ड क्र.१ मधील किमान ५0 ते ६0 घरगुती ग्राहकांचे मिटर जळाले, फ्रिज, टि.व्ही., फॅन, ही उपकरणे जळाली, लाईट गेले, अंतर्गत वायरिंगही जळाली. चार दिवस लोक अंधारात राहिले, ६ जूनला विज वितरण कंपनीने जळालेली मिटर काढून त्याठिकाणी नविन मिटर बसविणे गरजेचे असतांना कार्यालयात भंगारात पडलेली मिटर ग्राहकांच्या मस्तकी मारुन प्रत्येक घरात बसविली. त्या भंगार मिटरवर मागील रिडींग तसेच होते. त्या रिडींगनुसार विज बिलाची आकारणी करण्यात आली. चक्क ७४२९ युनिटचे बिल ९१ हजार ३८0 रुपये बिल ग्राहकाच्या मस्तकी मारले. ग्राहकांनी संपर्क साधला असता सिंदखेडराजा येथे जावून बिल दुरुस्ती करुन घ्या, असे उडवा उडवीचे उत्तर देतात. त्यामुळे ५0 ते ६0 ग्राहकांना आलेले लाखाचे बिल दुरुस्ती करीता आता सिंदखेडराजाला फेर्या माराव्या लागणार आहे.
लाखाचे बिल देवून विज ग्राहकांची लूट
By admin | Updated: July 2, 2014 22:49 IST