शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोणार सरोवराला दूषित पाण्याचा धोका!

By admin | Updated: March 10, 2017 01:53 IST

निरी प्रकल्पातील पाणी सरोवरात !

किशोर मापारी लोणार, दि. ९- जागतिक दर्जाच्या लोणार सरोवरामध्ये निरी प्रकल्पातील दुषित पाणी जात आहे. या दुषित पाण्यामुळे ऐतिहासिक लोणार सरोवराला धोका निर्माण झाला असून संवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जगातील आश्‍चर्य समजल्या जाणार्‍या व संशोधकांचा नेहमीच संशोधनाचा विषय ठरलेल्या लोणार सरोवरावराचे जतन होण्यासाठी विविध पातळ्य़ांवर प्रयत्न केले जात आहेत. शहरातील सांडपाणी सरोवरापर्यत पोहचू नये यासाठी १५ वर्षापूर्वी ३६ लक्ष रुपये खर्च करुन नबीच्या खड्डयाजवळ दगडी भिंत बांधण्यात आली. मात्र ही भिंत बांधल्यानंतरही अस्वच्छ पाणी सरोवरात जात असल्याचे चित्र आहे. यामुळे सरोवराच्या खार्‍या पाण्यात असलेली अतिशय दुर्मिळ जैवविविधता धोक्यात आली आहे. यामुळे जगभरातील संशोधकांनी चिंता व्यक्त केली आहे. राज्यातील काही विज्ञानप्रेमिंनी निसर्गाचा हा अद्भूत ठेवा जतन आणि संवर्धनाची याचिका दाखल केली होती. यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य शासनाने सरोवराच्या जतन आणि संवर्धनासाठी विकास आराखडा तयार केला. त्यानुसार सरोवरात जाणारे शहरातील दुषित पाणी रोखण्यासाठी २0११ मध्ये १ कोटी २५ लक्ष रुपये निधी मंजूर केला. यासाठी शासनाने निरी (राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रीकी संशोधन संस्था नागपूर) यांच्याकडून सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचा आराखडा तयार करुन प्रकल्पाचे काम सुरु केल्यापासून वर्षभरात पूर्ण करायचे होते. मात्र अनेक वर्ष होऊनही काम अपूर्ण आहे. जी भिंत उभारण्यात आली ती निकृष्ट दर्जाची असल्याचा आरोपी विज्ञानप्रेमींकडून होत आहे. - शहरातील सांडपाणी थांबविण्यासाठी सरोवर काठावर उभारलेल्या सांडपाणी प्रकल्पाच्या निकृष्ट कामामुळे ऐतिहासिक लोणार सरोवराची दुरवस्था झाली आहे. जोपर्यंत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम चांगले होत नाही, तोपर्यंत सदर प्रकल्प हस्तांतरण करुन घेणार नाही.- भूषण मापारी ,नगराध्यक्ष ,लोणार .- सदर प्रकल्पाची देखरेख योग्यरीतीने झाल्यास प्रकल्प कार्यान्वित होऊन शहरातील सांडपाणी सरोवरात जाणार नाही. यामुळे सरोवराचा परिसर दुषित होण्यापासून वाचेल.-प्रा.गजानन खरात, सरोवर जतन व संवर्धन समिती, लोणार .